Friday, 9 August 2013

उखाणे .........

1            रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
                ----------  रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन
  नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
  --------- च्या घराण्यात ---------- रावांची झाले मी राणी
  पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
  ---------- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते
  सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
   ---------- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई
   हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
   ------ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी
   शिंपल्यात सापडले माणिक मोती
   ------ रावांच्या जीवनात झाले मी सारथी
   महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स
   ------ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस
   आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
   ----- रावांना घास देते गोड जिलेबीचा
   मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
   ----- रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स
१०    आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
   ----- रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी
११    सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी
   ----- रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी
१२    सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
   ----- रावांचे नाव घेते ऐका सारेजण
१३    सासरचे निराजंन माहेरची फुलवात
   ----- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात
१४    जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
   ----- रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
१५    माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
   त्यातच एकरुप ----- रावांचे सूख निर्झर
१६    आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश
   ----- रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश
१७    पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती
   ----- रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती
१८    सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार
   यज्ञ देवतांचा आधार ----- राव माझे आधार
१९     मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
    ----- रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती
२०     पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात
    ----- रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात
21             गजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद
              ----- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात
२२ सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी
----- रावांचे नाव घेते ------ च्यावेळी
२३ संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
----- रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा
२४ स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी
----- रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी
२५ रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
-----रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा
२६ नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा
----- रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा
२७ मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार
----- रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार
२८ हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
----- रावांच्या जीवनात आहे मला गोडी
२९ सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात
----- रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट
३० भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
----- रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची
३१ जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले
----- रावांच्या नावाकरीता एवढे का अडविले
३२ शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
----- रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान
३३ आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
----- रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
३४ कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले
----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले
३५ माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
----- रावांच्या संसारात मन घेते वळून
३६ लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
----- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी
३७ संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान
----- रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान
३८ लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने
----- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने
३९ संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते ------ रावांबरोबर
४० नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
----- रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचा
41          सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
            ----- रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड
४२ अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली
----- रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली
४३ नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
आजपासून मी झाले ----- रावांची ग्रुहमंत्री
४४ शब्द तिथे नाद कवी तिथे कविता
----- रावांची जोड जणू सागर आणि सरिता
४५ नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण
----- रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण
४६ चंदनाच्या झाडावर बसला मोर
----- रावांच्या जीवावर मी आहे थोर
४७ चंद्राचा उदय, समुद्राला भरती
----- रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरती
४८ सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास
----- रावांना देते मी जिलेबीचा घास
४९ पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप
----- रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आज
५० घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस
----- रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळस
५१ सूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
----- रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले
५२ अंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य
----- रावांचा आनंद हेच माझे सौख्य
५३ मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार
----- रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकार
५४ आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे
----- रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे
५५ नीलवर्ण आकाशात चमकतात तारे
----- रावांचे नाव घेते लक्ष दया सारे
५६ सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला
----- रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला
५७ इग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून
----- रावांचे नाव घेते ----- ची सून
५८ खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड
----- रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड
५९ इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर
---- रावांचे नाव घेते सोडा माझा पदर
६० फुलात फुल जाईचे फुल
----- रावांनी घातली मला भूल
61           साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज
             ----- रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज
६२ पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून
----- राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुन
६३ संसार सागरात प्रीतीच्या लाटा
----- रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटा
६४ आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस
----- राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस
६५ सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
----- रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह
६६ लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा
----- रावांसाठी जीव झाला माझा वेडा
६७ आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन ----- रावांच्या बरोबर
६८ आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
----- राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा
६९ सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी
----- राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी
७० मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर
----- रावांचा सहवास लाभो जन्मभर
७१ प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी
जीवनाचे पूष्प वाहिले ----- रावांच्या चरणी
७२ चांदीच्या ताटात पक्वानांची रास
----- रावांना देते लाडूचा घास
७३ रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते
लाडूचा गोड घास ----- रावांना देते
७४ मंगळागौरीची पूजा मनोभावे करते
----- रावांसाठी दीर्घायुष्य मागते
७५ चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल
----- रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल
७६ नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर
----- रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर
७७ उंबरठयावरचं माप पायांनी लोटते
----- रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते
७८ आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
----- रावांचा सहवास जन्मभर लाभावा
७९ ----- रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन
८० मोत्याची माळ, सोन्याचा साज
----- रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज
81        मंगळागौरी माते नमन करते तुला
          ----- रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला
८२ दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती
----- रावांना ओवाळते मंगल आरती
८३ थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले
----- रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले
८४ सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा
----- रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा
८५ मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा
----- रावांच्या संसारात लावीन दिप नवा
८६ संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल
----- रावांना लागली बाळाची चाहूल
८७ फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे
----- रावांच्या बाळाचे आज आहे बारसे
८८ गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज
----- रावांच्या बाळाची आज आहे मौंज
८९ गोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष
----- रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष
९० सोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या
सोनार घडवी दागिने ----- रावांच्या बाळाला
९१ वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर
----- रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर
९२ दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
----- रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र
९३ अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा
-----रावांच्या नावावर भरते लग्नचुडा
९४ आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात
----- रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात
९५ शरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध
----- रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद
९६ जीवनात ही घडी अशीच राहू दे
----- रावांचे प्रीतफुल असेच हसु दे
९७ संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती
----- रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती
९८ कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
----- रावांचे नाव घेते माझ्या मनात
९९ श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान
----- रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान
१०० निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
लग्नाच्या दिवशी ----- स वाटे ----- रावांचे नाव घ्यावे
१०१ नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला
----- रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला
१०२ पोपटाची हाक ऐकून मैना लागली डाळींब सोलायला
----- रावांचे नाव घेऊन मी लागले माणिकमोती वेचायला
१०३ साता-याचे पेढे, नाशिकचा चिवडा
----- रावांची निवड हाच माझा निवाडा
१०४ व्रुंदावनी कोणी बाई तुळस लाविली
----- रावांच्या संसारात आहे शीतल सावली
१०५ ध्येय, प्रेम, आकांक्षांची जिथे होतसे पूर्ती
अशा ----- रावांची माझ्या मनी मूर्ती
१०६ अमेरीकेत आहे न्यायदेवतेचा पुतळा
----- रावांचे नाव घेते मला सांभाळा
१०७ उगवला सायंतारा, रातराणी बहरली
----- रावांचे नाव घेते वरात दारी आली
१०८ स्वप्नपूर्तीच्या क्षणी आळविते केदार
----- रावांच्या मुळे मला मिळाले घरदार
१०९ सावळ्या ढगांना सोनेरी कडा
----- रावांच्या हातांचा माझ्याभोवती वेढा
११० प्रेमरुपी नंदादिपात लावते प्रितीची फुलवात
----- रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात
१११ इग्रंजी भाषेत भिंतीला म्हणतात वाँल
---- रावांच्या नावाने कुंकु लावते लाल
११२ अशोकवनात लावली केळी
----- रावांचे नाव घेते संध्याकाळच्यावेळी
११३ यमुनेच्या काठी क्रुष्ण खेळत होता खेळ
----- रावांचे नाव घेते संध्याकाळचीवेळ
११४ इग्रंजी भाषेत चाकुला म्हणतात नाईफ
----- राव माझे हजबन्ड मी त्यांची वाईफ
११५ गुलाबाचे झाड फुलांनी वाकले
----- रावांमुळे सासरी पाऊल टाकले
११६ लग्नप्रसंगी लोक करतात आहेर
----- रावांसाठी सोडले आईवडिल अन माहेर
११७ अमरावतीच्या अंबादेवीला सोन्याचा साज
----- रावांबरोबर शुभमंगल झाले आज
११८ पाटल्या केल्या हात दिसे सवाई
वडिलांनी माझ्या ----- रावांना केले जावई
११९ जोडवी केली,  तोरडया केल्या, नथ केली जाईची
----- रावांसाठी आशा सोडली मी माझ्या आईची
१२० मिठाचा सत्याग्रह झाला समुद्राकाठी
----- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी
121        भाऊ माझा दादा, बहिण माझी ताई
            ----- रावांसाठी सोडली प्रेमाची आई
१२२ असंख्य तारे नभात पाहावेत निरखून
----- रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून
१२३ काचेच्या पेल्यात सुखदुःखाचं पेय
----- रावांना किर्ती मिळावी हेच माझे ध्येय
१२४ द्वारकेत क्रुष्ण, अयोध्येत राम
----- रावांचे चरण हेच माझे चारही धाम
१२५ कुबेराच्या भांडारात हिरे-माणकांच्या राशी
----- रावांचे नाव हिच माझी अयोध्या काशी
१२६ नाशिक केले, पंढरपूर केले, करायची राहिली काशी
----- रावांचे नाव घेते ----- ची भाची
१२७ काचेच्या अलमारीत गणपतीची मुर्ती
----- राव बसले पुजेला मी ओवळते आरती
१२८ सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मणी
----- राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी
१२९ हाताने करावे काम मुखाने म्हणावे राम
----- रावांचे चरण हेच माझे चारही धाम
१३० सासु-सासरे ज्ञानी, आई-वडिल सदगुणी
----- रावांच्या नावाने गळ्यात घातले काळे मणी
१३१ अडचणीच्या वेळी कामात पडते साठवण
----- राव इथे नसले कि त्यांची येते आठवण
१३२ २०० शे ची दमनी, ३०० चा बिछाना
----- राव बसले धुरीवर चंद्र सुर्य दिसेना
१३३ काचेची बांगडी केसापेक्षा बारीक
----- रावांचे नाव घेते आज आहे ----- तारीख
१३४ आता वाजले सहा
----- राव म्हणतात माझ्याकडे एकदा तरी पहा
१३५ चांदीची कुयरी हळदी कुंकवाने भरावी
----- रावांची सेवा जन्मोजन्मी घडावी
१३६ चहा केला नेऊन दिला, दुधाने भरले कप
----- रावांसाठी केले अठरा वर्षे तप
१३७ पोथी, पुराणे वाचून बोध होतो मनाला
----- रावांचे नाव घेते वटसावित्रीच्या सणाला
१३८ चिकन सुपारी फोडावी दाताने
----- रावांचे काकण सोडावे उजव्या हाताने
१३९ रिमझीम पाऊस पडे मोत्याचा सुटला वारा
----- रावांच्या घरी येताना डोळयाला लागतात धारा
१४० सोन्याच्या बेसरीत पाचूचा खडा
----- राव अन माझा जन्माचा जोडा
141         नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा
            ----- रावांच्या संगतीत संसार करते सुखाचा
१४२ श्रीमतांची श्रीमंती, गरीबाचा देव वाली
----- रावांचे नाव घेऊन मी झाले भाग्यशाली
१४३ सोन्याचे तबक चांदीची परात
----- रावांचे नाव घेते नव्या घरात
१४४ संगीत नाटकात नाटक सुभद्राहरण
----- रावांचे नाव घ्यायला हरतालिकेचे कारण
१४५ कस्तुरीचा जन्म सुगंधाकरीता
माझे जीवन ----- रावांकरीता
१४६ वडिलांनी केले लग्न, मामानी केला आहेर
----- रावांसाठी सोडले प्रेमाचे माहेर
१४७ हूरहूर दाटली मनात, जीव माझा बावरला
----- रावांच्या ओढीनं माहेरचा मोह सोडला
१४८ गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाब कळी
----- रावांचे नाव घेते ----- च्यावेळी
१४९ सासुबाई आहेत प्रेमळ, सासरे आहेत दयाळू
------ राव तर आहेत अतिशय मायाळू
१५० चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा
----- रावांसारखा गुणी पती जन्मोजन्मी मिळावा
१५१ बोलताना जिभेचा जाऊ देऊ नये तोल
----- रावांच्या प्रीती इतके नाही कशाचे मोल
१५२ सनई आणि चौघडा वाजे सप्तसुरात
----- रावांचे नाव घेते ----- च्या घरात
१५३ वडिलांची छाया आईची माया
----- रावांच्या सुखासाठी झिजवेन मी काया
१५४ बहिणीसारख्या नंदा भावासारखे दिर
----- रावांचे नाव घेण्यासाठी झाले मी अधीर
१५५ तिळ्गुळ घ्या गोड गॊड बोला
----- रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला
१५६ श्रीमंत असो वा गरीब असो स्त्रियांना आवडते माहेर
----- रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
१५७ संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व
----- रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचे महत्व
१५८ खडी साखरेची गोडी अन फुलांचा सुगंध
----- रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद
१५९ कपाळावर कुंकु हिरवा चुडा हाती
----- राव माझे पती माझे भाग्य किती
१६० झाशीच्या राणीचा स्वातंत्र्यासाठी झाला घात
----- रावांचा जन्मोजन्मी धरीन मी हात
161         पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात
            ----- रावांचे नाव घेते ----- च्या अंगणात
१६२ सौभाग्याचं लेणं काळी पोत
----- रावांच्या जीवनात उजळीन जीवनज्योत
१६३ तुकारामांचा अभंग वामनांची कविता
----- राव आहेत सागर मी त्यांची सरिता
१६४ श्रीमंत माणसांना पैशाची धुंदी
----- रावांचे नाव घ्यायची पहिलीच संधी
१६५ काचेच्या ग्लासात चकचकते दही
माझ्या मंगळ्सुत्रावर ---------- रावांची सही
१६६ तांब्याच्या पळीला नागाची खुण
---------- रावांचं नाव घेते ----------- घराण्याची सुन
१६७ शंकराच्या पिंडीवर बेल वाह्ते वाकुन
----------- रावांच नाव घेते पुजेचा मान राखुन
१६८ समुद्राला आली भरती नदीला आला पुर
----------- रावांसाठी माहेर गेले दुर
१६९ माहेरचं निरंजन सासरची फुलवात-------------
रावांचं नाव घ्यायला करते आजपासुन सुरुवात
१७० मोर पक्षी पाण्याला हौशी
-----------  रावांचं नाव घेते पुनवेच्या दिवशी
१७१ दारी होती तुळस तिला घालते पळी - पळी पाणी
आधी होती आईबापाची तान्ही नंतर झाली --------- रावांची राणी
१७२ गुलाबाच्या कळ्या पेटीत
------------ राव आहेत माझ्या मुठीत
१७३ अबोलीचा गजरा रुपयाला एक
----------- रावांचं नाव घेते ----------------- घराण्याची लेक
१७४ लाल मणी तोडले काळे मणी जोडले
------------ रावांसाठी आई-बाप सोडले
१७५ साजुक तुपात नाजुक चमचा
-----------चे नाव घेते आग्रह तुमचा
१७६ निळ्या आकाशात पक्षांची चाहूल
------------रावांच्या जिवनात टाकते मी पहीलं पाऊल
१७७ वीटांवर वीटा शंभर वीटा
------------- राव आहेत माझ्याजवळ आता बाकी सर्वांनी फुटा
१७८ हिमालयाच्या पर्वतावर बर्फ़ाच्या राशी
---------चे नाव घेते ग्रुह्प्रवेशाच्या दिवशी
१७९ केळीचं पान कसं कुरुम कुरुम वाजतय
------- रावांचं नाव घ्यायला मला लाज वाटतेय
१८० इंग्लंड अमेरीका मी हाय कुमारीका
मला नाव घ्यायला सांगू नका
181         नवरा बायकोचा विश्वास हाच सुखी संसाराचा मंत्र
            --------- राव म्हणतात याच सुखासाठी सर्वांनी जपावे एकमेकांचे तंत्र
१८२ साता जन्माचे सुख देवाने मला एका जन्मात दिलं
---------------- रावांबरोबर संसार करताना ते मी अनुभवलं
१८३ उखाणा घेते भारतीय संस्क्रुतीचा माहिमा
-------- रावांचे नाव घेताच गाली चढे लाजेचा लालिमा
१८४ ग्रीष्म रुतुत सुखावते आम्र व्रुक्षाची छाया
----------- रावांच्या बरोबर घातला मी संसाराचा पाया
१८५ देणा-याने देत रहावे घेणा-याने घेत रहावे
--------- च्या संगतीत माझे आयुष्य फुलावे
१८६ असा असावा सुखी संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागेल माघार
----------- राव आहेत माझ्या जीवनाचा आधार
१८७ महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून
---------------- चे नाव घेते आपला मान राखून
१८८ देवीच्या देवळात विजेचा झंकार
--------- चे नाव घेते हेच माझे अलंकार
१८९ गीतात जसा भाव फुलात गंध
--------- बरोबर जुळले रेशमी बंध
१९० चंद्रतारांगणाच्या मेळाव्यात रजनी हसते
------- च्या सहवासात ------------रमते
१९१ निरोपाच्या प्रांगणात पडला स्म्रुति पुष्पांचा सडा
-------- च्या सोबत चालले घेऊन आशिर्वादाचा धडा
१९२ रातराणीच्या सुगंधाने निशीगंध झाला मोहित
मागते आयुष्य ---------- च्या सहित
१९३ ह्रुदयरुपी शिंपल्यात प्रितिचे पाणि
------ च्या नावाने बांधले मंगल मणी
१९४ मंगळ्सुत्र हा सौभाग्याचा अलंकार
-------च्या सह ध्येय आशा होवोत साकार
१९५ मंगळ्सुत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा
------- चे नाव घेऊन मान राखते सर्वांचा
१९६ हत्तीने केली मस्ती धुळीने भरले आकाश
--------- च्या चेहरयावर सदगुणांचा प्रकाश
१९७ सोने हिरे माणिक मोत्यांनी घडविले जडावाचे डोरले
---------- चे नाव माझ्या ह्रुदयात कोरले
१९८ बारामतीत आहे मोरोपंतांची आर्या
सर्वांसमोर नाव घेते ---------- ची भार्या
१९९ विवाह म्हणजे सम्रुध्द सहजीवन
------- च्यामुळे झाले माझे जीवन नंदनवन
२०० बचत गटाच्या माध्यमातुन बांधते उत्कर्षांच्या भिंती
---------- चे नाव घेऊन करते एकात्मतेची क्रांती
201          जीवनाला सुगंध असावा चंदनाचा
             ---------- चे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा
२०२ घराच्या मागे पिकला गहू
लग्न नाही झालं तर नाव काय घेऊ
२०३ गांधीजी म्हणाले चले जाव घोडा गेला पळून
----------- च नाव घेते सर्वांनी पहा वळून
२०४ सत्यनारायणाच्या पुढे उदबत्तीचा पुडा
---------- च्या नावाचा भरलाय हिरवा चूडा
२०५ हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
--------- चे नाव घेते आता तरी जाऊया घरात
२०६ पेणचे पेढे नाशिकची द्राक्षे वसईची केळी
केळ्यांची काढली साल ------- रावांच्या नावाने कुंकु लावते लाल
२०७ वसंत ॠतुत कोकीळा गाते --------- रावांचे नाव
मी  ----------- राणी घेते
२०८ इंग्रजीत आईला म्हणतात मदर वडिलांना म्हणतात फादर
---------- रावांच्या नावाने डोक्यावर घेते पदर
२०९ चांदीचा निरांजन कापसाची फुलवात
----------- च्या नावाची आजपासुन केली सुरूवात
२१० काचेच्या बशीत बदामाचा हलवा
--------- चे नाव घेते सासुला बोलवा
२११ सत्यनारायणाच्या पुजेला हळदी कुंकु वाहते वाकुन
----------- चे नाव घेते तुमचा मान राखून
२१२ महादेवाच्या पिंडीवर द्राक्षाची वेल
-------- राव करतात पुजा आणि मी वाहते बेल
२१३ महादेवाच्या पिंडीला चौकोन चिरा ----------
राव करतात पुजा आणि मी वाहते हिरा
२१४ स्टिलच्या प्लेटीत फनासाचे गरे ------------ राव
दिसतात बरे पण नांदवतील तेव्हाच खरे
२१५ सहज पडली बाहेर नजर गेली आकशात
-------- रावांचा फोटो भारताच्या नकाशात
२१६ दया क्षमा शांती हेच माझं माहेर
------------ रावांनी केला सौभाग्याचा आहेर
२१७ मारुतीच्या देवळात उदबत्तीचा वास
---------- भरवते पेढयाचा घास
२१८ सत्यनारायण देवा नमस्कार करते तुला
---------- नाव घेते अखंड सौभाग्य लाभो मला
२१९ मान राखून तुमचा, मैत्रिणींनो घेते मी उखाना
पण ……………… रावांचं नाव घ्यायला लागतो मला बाई बहाणा
२२० नणंदा माझ्या बहिणी जावा माझ्या मैत्रिणी, सासरच्या अंगणात फुलली रातराणी
------------- रावांचे नाव घेते संसारात आहे मी समाधानी
221         अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान
         ----------- रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान
२२२ मनातल्या भावना दिसतात डोळ्यांत
मी बघते आरशात तर ---------- रावच दिसतात मला माझ्या डोळ्यांत
२२३ मुके झाले शब्द ओठी लज्जेचे बंधन
----------- नावाभोवती कशी करू उखाण्याची गुंफण
२२४ सागर तेथे सरिता कवी तेथे कविता
------------ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता
२२५ गळ्यात गळसरी नाकात घातली नथ
---------- च्या साथीने ओढीन संसाराचा रथ
२२६ दिल्ली का कुतूबमिनार, दौलताबाद का चान्दमिनार
हैद्राबाद का चारमिनार ------- मिया से मेरे जीवन में सदाबहार
२२७ फुलासारखं शील त्याला कीर्तिचा सुगंध
---------- चा सहवास हाच माझा आनंद
२२८ उगवले अरुण उषेला आली लाली
---------- रावांच्या जीवनात मी भाग्यशाली
२२९ रत्नजडित सिंहासन मखमली गालिचे, सासुबाईंच्या पोटचे वन्संच्या पाठचे
-------- राव झाले आमचे विसरा बरे तुमचे
२३० नजरानजर झाली छोट्याशा बोळात
दोघेही हसलो ओठातल्या ओठात
221 बघता बघता वरमाला पडल्या गळ्यात
--------- रावांचं नाव घेते मैत्रिणिच्या घोळक्यात
२३१ गजाननाची क्रुपा गुरुचां आशीर्वाद
------- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात
२३२ आली आली सक्रांत घ्या सौभाग्याचं वाण
----- राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण
२३३ तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रिणींची साथ
संसाराच्या वळणावर मिळाला -------- रावांचा हात
२३४ सुखदुःखाच्य़ा ऊनपावसात चालतो संसाराचा खेळ
--------- रावांचे नाव घेते ---------- ची वेळ
२३५ कर्ता करविता परमेश्वर त्यावर टाकते मी भार
------- रावांचे नाव घेते कर देवा संसार नौका पार
२३६ पती पत्नी असतात सुखदुःखाचे साथी
-------- रावांचे नाव घेते आशीर्वाद असु दयावा माथी
२३७ कळत नाही माझेच मला आहे स्वप्न कि भास
------- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
२३८ गुलाबाचे फुल गणपतीला वाहीले
------ रावांसाठी ------- गाव पाहीले
२३९ रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाले मोहीत
------- रावांना आयुष्य मागते सासुसास-यासहीत
240           वन, टु, थ्री
               ------ रावांचे बोलणे एकदमच फ्री
२४१ ध्येयप्राप्तीसाठी प्रत्येकाने झटावे
------ रावांचे नाव घेण्यास मागे का हटावे
२४२ ------- च्या प्रेमाला जगात नाही तोड
परमेश्वराच्या चरणी प्रार्थना शेवट व्हावा गोड
२४३ सोन्याचे ताट चांदीची वाटी
सात जन्म घेईन मी ------- रावांसाठी
२४४ रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा
जीवनाचा खेळ समजला ------- रावांमुळेच सारा
२४५ चांदीच्या सुटकेस मध्ये शालूची घडी
------- ने पिक्चर दाखविला माहेरची साडी
२४६ मंगळसुत्राच्या दोन वाटया एका वाटीत सासर दुस-या वाटीत माहेर
------- रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर
२४७ नंदनवनात फुलली सोन्याची कमळे
------ रावांच्यामुळे मला संसाराचा अर्थ कळे
२४८ मुळामूठेच्या संगमावर वसले सूंदर पुणे
------- रावांच्या संसारात नाही कशाचे उणे
२४९ निळया नभावर कर्तुत्वाचा असे रुपेरी ठसा
------ रावांसह करीत आहे संसाराचा श्रीगणेशा
२५० गानकोकीळ बालगंधर्व गाती सूरात
------- रावांचे नाव घेते ----- च्या घरात
२५१ पुजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा
------- रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चूडा
२५२ चांदीचा तांब्या, रुप्याची परात
------- रावांचे नाव घेते ----- च्या घरात
२५३ झगमगीत दिव्यांच्या रोषणाईने सजली वरात
------- रावांचे नाव घेते ------- च्या दारात
२५४ राम लक्ष्मण जोडी अमर झाली जगात
------- रावांचे नाव घेते ------- च्या घरात
२५५ उत्तर दिशेला चमकतो अढळ ध्रुवतारा
------- रावांचा उत्कर्ष हा माझा अलंकार खरा
२५६ काळसर आकाशात इंद्रधनूचे सात रंग
------- रावांचे नाव घेता मनी उठले तरंग
२५७ सतारीचा नाद विणेचा झंकार
------- रावांच्या समवेत सुरू झाला संसार
२५८ तळयातला राजहंस सुखवितो वनाला
------- रावांचे नाव घेते माझ्या मनाला
२५९ मला नको हिरे माणिके, नको आकाशातले तारे
------- राव हेच माझे अलंकार खरे
260       वेलदोडयाच्या वेलावर हवा सुटली गार
           ------- रावांचे नाव घेते रात्र झाली फार
२६१ देवासमोर काढली रांगोळी मोराची
------- रावांचे नाव घेते स्नूषा थोरांची
२६२ न चुकता टी. व्ही. वर बघत असते रामायण रविवारी
न कंटाळता -------रावांचे नाव घेते ------- वारी
२६३ विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी
------- रावांचे नाव घेते सा-यांसाठी
२६४ लावीत होते कुंकु त्यात सापडला मोती
------- राव पती मिळाले म्हणून भाग्य मानू किती
२६५ जाई, जुई, चमेली, शेवंती, नागचाफा
------- रावांचे नाव घेऊन माळते सोनचाफा
२६६ हिंदमातेच्या डोक्यावर सोन्याची जाळी
------- रावांचे नाव घेऊन बांधल्या मुंडावेळी
२६७ सोन्याचं मंगळसुत्र सोनाराने घडवलं
------- रावांचे नाव घेताना ------- नी अडवलं
२६८ सत्यभामेने श्रीक्रुष्णाची केली सुवर्णतुला
------- रावांचे नाव घेते आशीर्वाद दया मला
२६९ समुद्राला कुणी म्हणे सागर, कुणी म्हणे रत्नाकर
------- राव आहेत माझे जन्मोजन्मीचे प्रियकर
२७० चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
------ रावांच्या नावाचा घालते सौभाग्याचा चूडा
२७१ दहयाचे केले श्रीखंड, दूधाचा केला खवा
------- रावांचे नाव घेते नीट लक्ष ठेवा
२७२ केसात घालते फुल, डोळयात घालते काजळ
------- रावांचे नाव घेऊन वाहते फुलांची ओंजळ
२७३ प्रीतीचा व निष्ठेचा पसरु दे सुगंध
------- रावांच्या जीवनात निर्मीन मी आनंद
२७४ लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा मोडून कशी रूसू
------- रावांना घास देताना मला येई गोड हसू
२७५ माहेरचे दिवस पाखरासारखे उडाले
स्म्रुतीठेवा त्यांचा घेऊन ------- रावांच्या घरी आले
२७६ हिरव्या हिरव्या रानात मोहक पिवळी फुले
------ रावांचे नाव घेताना मन हिंदोळयावर झुले
२७७ गोपाळ क्रुष्णाला आहे बासरीचा छंद
------ रावांच्या जीवनात आहे मला आनंद
२७८ कात, चुना, लवंग पानाचा विडा
------- रावांच्या नावाचा भरते लग्नाचा चूडा
२७९ खवळला समुद्र लाटा काठोकाठ
------- रावांचे नाव घेते ------- च्या पाठोपाठ
280          रजनीचा भांडार शंशाकाच्या दारी खुले
             माझे मानस मंदीर ------- रावांनी जिंकले
२८१ पाटानं आणलं पाणी शेतं पिकली मोत्यावाणी
------- रावांच्या नावचं मोल आहे सोन्यावाणी
२८२ आधी ताना आलापी मग गाऊ भैरवी
------- रावांच्या नावाची किती सांगू थोरवी
२८३ राम, लक्ष्मण, सीता तीन मुर्ती साक्षात
------- रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात
२८४ कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर
------- रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर
२८५ कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात
------- रावांचे नाव घेते सुवासिनींच्या मेळयात
२८६ अश्रुपूर्ण नेत्रांनी माहेरचा निरोप घेते
------- रावांच्या बरोबर मी ग्रुहप्रवेश करते
२८७ स्वाती नक्षत्रातील थेबांचे शिंपल्यात होती मोती
------- रावांच्या संगतीत उजळली जीवनज्योती
२८८ यज्ञ, धर्म, किर्ती, ऐश्वर्य आणि संपत्ती
------- रावांचे नाव हीच माझ्या मनाची त्रुप्ती
२८९ टपोरा मोगरा फुलला छान
------- रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान
२९० पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने, फुले
------- रावांचे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले
२९१ काजव्यांचा प्रकाश दिसे अंधार आहे तोवर
------- रावांचे नाव घेते आग्रह आहे तोवर
२९२ चंदनाच्या पेटीला सुवर्णाच्या चूका
------- रावांचे नाव घेते सा-यांनी ऐका
२९३ सागराला आली भरती नदीला आला पूर
------- रावांच्या प्रीतीसाठी आई-वडिल केले दूर
२९४ पौर्णिमेच्या चंद्राची उज्जवल प्रभा
------- राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा
२९५ विवाहाच्या सोहळयात अत्तर गुलाबांचा थाट
------- रावांचे नाव घेऊन सोडते मुंडावेळीची गाठ
२९६ दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस
------- रावांचे नाव घेते हळदी-कुंकवाचा दिवस
२९७ अर्जुनाच्या रथाचे क्रुष्णाने केले सारथ्य
------- रावांच्या घरी करीन सर्वांचे अतिथ्य
२९८ पारिजातकाचे फुल म्हणजे सौदर्याचे प्रतीक
थोरामोठय़ांच्या आशीर्वादाने लाभले ------- रावांसारखे पती
२९९ प्रतिभेचा अविष्कार म्हणजे काव्य
------रावांच्या सहवासात आहे माझे भवितव्य
300        डोंगरकपारी तरु लतावेली
            ------- रावांनी दिली गुलाबाची मोहक कळी
३०१ उगवत्या रवीला उषेची ऒढ
------- रावांच्या संसारात लाभली ------- ची जोड
३०२ गरिबीची करु नये निंदा, श्रीमंतीचा करु नये गर्व
------- रावांच्या नावावर आर्पिले जीवन सर्व
३०३ शिवाजीसारखा पूत्र धन्य जिजाऊची कूशी
------- रावांचे नाव घेते बारशाच्य़ा दिवशी
३०४ तारुण्याच्या वाटेवर बालपणाची झाली इतराजी
------- रावांच्या नावाने मिळाली नवलाई संसाराची
३०५ माहेरचे प्रेम खेचती मागे पुढे
------- रावांच्या साथीसाठी माहेर सोडावे लागे
३०६ प्रेमाचा दिला हुंडा मानाची केली करणी
------- रावांचे नाव घेऊन करते घरभरणी
३०७ वर्षाऋतूच्या आगमनाने धरती होते हासरी
------- रावांचं नाव घेते मी नवपरिणिता लाजरी
३०८ नभांगणी चांदणीला शोभा चंद्रमाची
सौभाग्याच्या दानात -----ला शोभा ------ रावांची
३०९ सागराच्या लाटा उसळताना दिसती शुभ्रधवल
------- रावांचे नाव घेते, त्यात काय नवल ?
३१० भावंडाचा सहवास आईवडिलांचा आशिर्वाद
------- रावांचे नाव घेताना तुमचेही लाभो आशिर्वाद
३११ प्रतिभेच्या अविष्कारातून काव्य बहरे
------- रावांच्या साथीने मन माझे मोहरे
३१२ हंडयावर हंडे सात हंडे त्यावर ठेवली परात
------- राव बसले दारात मी येऊ कशी घरात
३१३ कवीची कविता कवीनेच वाचावी
------- रावांची प्रेमाची फुले ओंजळीत वेचावी
३१४ दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून
------- रावांचे नाव घेते तुमचा मान राखून
३१५ चतूर्थीच्या दिवशी चंद्र निघाला हिरवा
------- राव बसले पुजेला मी निवडते दुर्वा
३१६ गुलाबाचे फुल मधोमध पिवळे
------- राव दिसतात क्रुष्णासारखे सावळे
३१७ हिमालय पर्वतातुन नदी वाहते कनिका
------- रावांचे नाव घेते ------ ची बालिका
३१८ सायकल चालते वेगाने, बस धावते क्रमाने
------- रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणे
३१९ करवंदाची साल चंदनाचे खोड
------- रावांचे बोलणे अम्रुतापेक्षा गोड
320        इंग्रजी भाषेत पाण्य़ाला म्हणतात वाँटर
          ------- रावांचे नाव घेते ------- ची डाँटर
३२१ आम के पेड पर बैठे थे बंदर
------- रावजी का घर है स्वर्ग से सुंदर
३२२ पूर्णा नदीच्या काठावर क्रुष्णा वाजवितो बासरी
------- रावांसोबत आले मी सासरी
३२३ मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची
------- राव आहेत तर कमी नाही कशाची
३२४ आधुनिक स्वयंपाक घरात शोभते डायनिंग टेबल
------- रावांच्या नावासमोर माझ्य़ा गावाचे लागले लेबल
३२५ आपले राष्ट्रगीत आहे जन - गण - मन
------- रावांना अर्पण केले तन - मन - धन
३२६ चांदीच्या चमच्याने वाढते मी मीठ
घाबरु नका ------- रावांचा संसार करीन मी नीट
३२७ मंदिराच्या गाभा-यात विठ्ठलाची मुर्ती
------- रावांची होवो सगळीकडे किर्ती
३२८ कशी बाई कोकीळा कुहू कुहू बोले
------- रावांनी आणली सोन्याची कर्णफुले
३२९ पेरुची फोड दिली पिंज-यातल्य़ा पोपटाला
------- रावांचे नाव घेते चंद्र तारे साक्षीला
३३० मंद मंद गंध घेताना झाले मी धूंद
------- रावांचे नाव घ्यायचा लागला मला छंद
३३१ गळयात मंगळसुत्र, मंगळसुत्रात डोरलं
------- रावांचे नाव माझ्या ह्रुदयात कोरलं
३३२ सासु सास-यांनी काम केलं पुण्याचे
------- रावांना दान दिले मला जन्माचे
३३३ पिवळा पितांबर श्रीक्रुष्णाच्या अंगावर घातला
------- रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला
३३४ मंगलदेवी, मंगलमाते वंदन करते तुला
------- रावांचे नाव घेते अंखड सौभाग्य दे मला
३३५ सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले
------- रावांशी लग्न करुन मी सौभाग्यवती झाले
३३६ नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार
------- रावांचा स्वभाव फारच उदार
३३७ प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची
रावांच्या साथीने सुरूवात करते सहजीवनाची
३३८ प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे
------- रावांच्या साथीसाठी माहेर सोडावे लागे
३३९ निळया नभात चंद्राचा प्रकाश
------- रावांवर आहे माझा विश्वास
340         इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग
            ------- रावांच्या संसारात मी आहे दंग
३४१ शिक्षणाने विकसीत होते संस्कारीत जीवन
------- रावांच्या संसारात राखीन मी सर्वाचे मन
३४२ सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा
------- रावांमुळेच लागला मला त्यांचा लळा
३४३ मला गूणवान पती मिळाले याचा वाटतो प्रत्येकाला हेवा
------- राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा
३४४ आज सारे सुख माझ्या दारी दाटले
------- रावांचे प्रेम अजून तरी नाही आटले
३४५ मी नव्हती सुंदर तरी मला निवडले
------- रावांचे हेच रुप मला फार आवडले
३४६ तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेलही शिंपडले
------- रावांचे मन मी केव्हाच जिंकले
३४७ केसात माळते मी रोज गुलाबाचे फुल
------- राव माफ करतात माझी प्रत्येक भुल
३४८ पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल
------- रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल
३४९ ------- रावांच्या नावाने भरला मी हिरवा चूडा
त्यांच्यावर करेन मी प्रेमाचा सडा
३५० स्वातंत्र्याच्या होमकूंडात विरांनी घेतली उडी
------- रावांच्या नावाने घालते गळयात मंगळसुत्राची जोडी
३५१ नाजूक अनारसे साजूक तूपात मळावे
------- रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे
३५२ चंदेरी सागरात रुपेरी लाटा
------ रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा
३५३ पौषातील धुंद वारा छेडितो माझ्या अंगाला
------- रावांचे नाव घेते सूर्यनारायणाच्या साक्षीला
३५४ दीनदुबळयाचे गा-हाणे परमेश्वरांनी ऐकावे
------- रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे
३५५ ग्रुहकामाचे शिक्षण देते माता
------ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता
३५६ शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल
------- रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊल
३५७ वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस
------- रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस
३५८ अंगणात होती मेथी पाणी घालू किती
------- रावांच्या हातात सत्यनारायणाची पोथी
३५९ डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल
------- रावांच्या नावाने कुंकु लावते लाल
360        ओल्याचिंब केसांना टाँवेल दया पुसायला
           ------- रावांचे नाव घेते शालू दया नेसायला
३६१ डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले
------- रावांचे नाव घेताना आनंदी मला वाटले
३६२ गुलाबाचे फुल दिसायला ताजे
------- रावांचे नाव घेते सौभाग्य माझे
३६३ अंगणी होती तुळस, तुळ्शीला घालत होती पाणी
आधी होती आईबापाची तान्ही नंतर झाली --------- रावांची राणी
३६४ दारी होता टेबल त्यावर होता फोन
-------- रावांनी पिक्चर दाखविला हम आपके है कौन
३६५ राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार
------- रावांनी घातला मला मंगळ्सुत्राचा हार
३६६ पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा
------- रावांनी आणला मला मोग-याचा गजरा
३६७ चांदीचे जोडवे, पतीची खुण
------- रावांचे नाव घेते ------- ची सून
३६८ नव्हती कधी गाठभेट एकदाच झाली नजरानजर
आई-वडिल विसरते ------- रावांसाठी सुटला प्रीतीचा पाझर
३६९ ह्र्दयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात
------- राचांच्या जीवनात लावते प्रीतीची फुलवात
३७० नववधू आले मी घरी जीव गेला बावरुन
------- रावांनी मारली हाक शिणचं गेला निघून
३७१ धरला यांनी हात वाटली मला भीती
हळूच म्हणाले -------- राव अशीच असते प्रीती
३७२ जेव्हा मी यांना पाहते चोरुन विचार करते मुक होवून
घडविले देवांनी ------- रावांना जीव लावून
३७३ घातली मी वरमाला हसले ------- राव गाली
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली
३७४ वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल
------- रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल
३७५ राजहंस पक्षी शोभा देतो वनाला
------- रावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला
३७६ सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान
------- रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान
३७७ आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे
------- राव हेच माझे अलंकार खरे
३७८ पर्जन्याच्या व्रुष्टीने स्रुष्टी होते हिरवीगार
------- रावांच्या नावाने घालते मंगळसुत्राचा हार
३७९ लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा
------- रावांचे नाव घेऊन उखाणा करते पूरा

३८०        गौरीहर पुजले अन बोहल्यावर चढले
           ------- रावांच्या सुखासाठी संसारात गढले
३८१ १२ वर्षे तुळशीला प्रेमाने घातले पाणी
देवतेच्या वरदानाने झाले ------- रावांची राणी
३८२ ------- रावांची कन्या झाली ------- पंतांची सून
------- रावांच्या राज्य़ात नाही कशाची उण
३८३ सौभाग्याचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे
------- रावांचे नाव घेते सुवासिनी पुढे
३८४ काश्मीरच्या नंदनवनात नाचतो मोर
------- रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर
३८५ नागपुरची संत्री कोकणातले नारळ
------- रावांचे नाव घेते साधे आणि सरळ
३८६ एकनाथाच्या घरी हरी पाणी भरतो कावडीने
------- रावांचे नाव घेईन मी आवडीने
३८७ प्रांजळपणे बोलणे, मनमोकळे हसणे
------- रावांच्या सहवासात कशाला हवे रुसणे ?
३८८ पती पत्नी असतात सुखदुःखाचे साथी
------- रावांचे नाव घेते जगदंबे वरद हस्त असु दे माथी
३८९ माहूर गडावर रेणुकेची वस्ती
------- रावांना मिळावे आयुष्य जास्ती
३९० पित्याने दिली विद्या मातेने दिले ग्रुहशिक्षण
------- राव मिळाले हेच माझे भुषण
३९१ वसंत ऋतुच्या आगमनाने कोकिळा गाते गाणी
अर्पण करते आयुष्य ------- रावांच्या चरणी
३९२ फुलला पळस रानोरानी, मोहरला आंबा पानोपानी
------- राव माझे धनी मी त्यांची अर्धांगिनी
३९३ शितल आहे चंदन वारा आहे मंद
------- रावांना सिनेमाचा भारीव छंद
३९४ आहे हौशी नणंद, प्रेमळ आहे जाऊ
------- रावांच्या गुणांचे गोडवे किती गाऊ
३९५ गणपतीला दुर्वा, शिवाला बेल
------- रावांच्या संगतीत बहरली संसाररुपी वेल
३९६ गुढीपाडव्याच्या सणाला पुरण्पोळीचा मान
------- रावांच्या सहवासात विसरते मी भूक तहान
३९७ अमावस्येच्या रात्री चांदोबाचं लपणं
------- राव हेच माझं गुलाबी स्वप्न
३९८ क्रुष्णाच्या हातात सोनेरी बासरी
------- रावांचे नाव घेताना सदा मी हसरी
३९९ स्वप्नातला गुलाब गालात हसला
------- रावांचे नाव घेण्यास मान कसला
400         अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा
             -------रावांना घास घालते वरण भात तुपाचा
४०१ यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली
------- रावांची जन्मदाती, धन्यती माऊली
४०२ श्रीक्रुष्णाच्या मस्तकावर सदैव असतो शेष
------- रावांचे नाव घेऊन करते मी ग्रुहप्रवेश
४०३ शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकून
------- रावांचे नाव घेते सर्वाचा मान राखून
४०४ ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
------- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल
४०५ पतिव्रतेचे व्रत घेऊन नम्रपणे वागते
------- रावांचे नाव घेताना आशिर्वाद मागते
४०६ अंगणात व्रुदांवन, व्रुदांवनात तुळस
------- रावांचे नाव घेताना कसला हो आळस
४०७ संसाररुपी वेलीचा गगनात केला झुला
------- रावांचे नाव घेते आशिर्वाद दयावा मला
४०८ मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा
------- रावांचे नाव घेते नीट लक्ष ठेवा
४०९ कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती
------- राव माझे पती सांगा माझे भाग्य किती
४१० सनई आणि चौघडा वाजे सप्तसूरात
------- रावांचे नाव घेते ------ च्या घरात
४११ मंदीराचे वैभव परमेश्वराची मुर्ती
------- रावांचे नाव घेऊन करते इच्छापुर्ती
४१२ पंचपक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे
------- रावांचे नाव घेताना कशाला आढे वेढे
४१३ मला नाही काही येत मी आहे साधी
------- रावांचे नाव घेते सर्वाआधी
४१४ रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा
------- रावांच्या नावाचा भरला हिरवा चुडा
४१५ कपाळाचं कुंकु जसा चांदण्याचा ठसा
------- रावांचे नाव घेते सारेजण बसा
४१६ माहेर तसं सासर नाते संबंधही जुने
------- राव आहेत सोबत मग मला कशाचे उणे
४१७ गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी
------- रावांचे नाव घेते ------- दिवशी
४१८ छ्न छन बांगडया, छूम छूम पैंजण
------- रावांचे नाव घेते ऐका सारेजण
४१९ ह्र्दयाच्या भावनांना प्रितीचा फुलोरा
------- रावांच्या सह फुलो सौख्याचा फुलोरा
420          शाहू राजे बांधतात कोल्हापूरी फेटा
           ------- रावांच्या संसारात आहे माझा अर्धा वाटा
४२१ हिरवा शालू नेसून आले
------- रावांच्या जीवनात समरस झाले
४२२ दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी
------- रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावेळी
४२३ काचेच्य़ा तांब्यात सरबत आहे गार
------- रावांचे नाव घ्यायला उशीर झाला फार
४२४ मोहमाया प्रेमाची जाळी पसरली दाट
------- रावांची सेवा करणे हीच माझी मोक्षाची वाट
४२५ चाफळया मंदीरात राम, सीता, लक्ष्मण
------- रावांचे नाव घेऊन घालते आपोषण
४२६ प्रेमाचा दिला हूंडा मानाची केली करणी
------- रावांचे नाव घेऊन करते घरभरणी
४२७ सासु सासरे प्रेमळ जावा दीर हौशी
------- रावांचे नाव घेते ------- च्या दिवशी
४२८ निशिगंधाच्या वासाने मन झाले मोहीत
------- रावांचे नाव घेते ------ सहीत
४२९ जात होते फुलाला पदर अडकला वेलीला
लिंबलोण कुणाला तर ------ रावांच्या गुणाला
४३० यमुनेच्या तिरावर क्रुष्ण वाजवतो पावा
------- रावांचे नाव घेते तुमचा आशिर्वाद हवा
४३१ सोनाराने मंगळ्सुत्र घडवले सोन्याच्या साखळीवर
------- रावांचे नाव माझ्या ह्रदयाच्या पाकळीवर
४३२ कबीर विणतो शेला देव घालतो घडी
------- रावांच्या जीवावर मी घालते मंगळसुत्राची जोडी
४३३ दया, क्षमा, शांती प्रेमाचे माहेर
------- रावांनी केला सौभाग्याचा आहेर
४३४ एक पाय ठेवते तळयात, एक पाय ठेवते मळयात
------- रावांचे नाव घेते सासरच्या मेळयात
४३५ अमुल्य वेळी उमलली कळी
------- रावांचे नाव घेते सायंकाळच्या वेळी
४३६ देहरूपी निरंजनात प्रेमरूपी वात
------- रावांचे नाव घ्यायला आज केली सुरूवात
४३७ शुभमंगलप्रसंगी गणेशाची साथ
------ रावांचे नाव घ्यायला आज केली सुरूवात
४३८ श्रीमंतीने दाखवू नये श्रीमंती, गरीबांना दयावी सवलत
------- रावांची विद्वता हीच माझी दौलत
४३९ श्रावणी सरी नंतर प्रुथ्वीची काया
------- रावांच्या घरी मिळते माहेरची माया
440          सुवासिक पारिजात बहरो प्रितीच्या दारी
             ------- रावांसाठी माहेर सोडून आले मी सासरी
४४१ १९४७ पुर्वी भारतात माजली होती आंदा-धुंदी
------- रावांना घास घालते बासुंदी
४४२ ल्याले मी आज सौभाग्याचा साज
------- रावांचे नाव घेते नववधु रुपाने आज
४४३ नागिणीच्या वेलीखाली हरीणी घेते विसावा
------- रावांचे नाव घेते शुभार्शिवाद दयावा
४४४ परमेश्वराचे सोबती सुखदुःखाचे भागीदार
------- रावांच्या जीवनात मी आहे साथीदार
४४५ काव्य तेथे कविता सागर तेथे सरिता
------- रावांचे नाव घेते तुमच्या इच्छेकरिता
४४६ सातासमुद्रापलीकडे सापडतात शिंपलेमोती
------ रावांचे नाव घेते तुमचा मान राखूनी
४४७ महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून
------ रावांचे नाव घेते तुमचा मान राखून
४४८ गर्व नसावा पैशाचा, अभिमान नसावा रुपाचा
-------रावांना घास घालते वरण भात तुपाचा
४४९ जीवनाच्या सागरावर सप्तरंगी फुल विचाराचा
------ रावांसह सुखी होईल प्रवाससंगीत संसाराचा
४५० निसर्गावर करु पाहत आहे आजचा मानव मात
अर्धांगी म्हणून दिला ------ रावांच्या हाती हात
४५१ जीवनाच्या कोंदणात फुलले प्रितीचे पुष्प
------- रावांच्या नावाने घेते मी सौभाग्याचा गुच्छ
४५२ मावळला सुर्य उगवला शशी
------- रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी
४५३ शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज
------- रावांचे नाव घेते गौर बसली आज
४५४ आदघर माजघर, माजघरांत पलंग, पलंगावर उशी
------- रावांच्या जीवावर मी आहे खुशी
४५५ शरयु नदीत जन्म झाला मेघदुतांचा
------- रावांच्या जीवनात उगम झाला आनंदाचा
४५६ माहेरच्या प्रागंणात वेचले ज्ञानकण
------- रावांचे नाव घेऊन बांधते कंकण
४५७ संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते ------- रावांबरोबर
४५८ सांजवात लावतेवेळी होते माहेरची आठवण
------- रावांसाठी ------ ची पाठवण
४५९ वाडयात सव्वाहात तुळशीचे व्रुदांवन
------- रावांचे नाव घेऊन तुमचे करीते आभिनंदन
460         सुखाच्या शेरी चढताना दुःखाचा नाही लवलेश
             ------- रावांसह करीते ग्रुहप्रवेश
४६१ उंबरठयावर पाय दिल्यावर लागली सूखी जीवनाची चाहूल
------- रावांचे नाव घेऊन टाकते दिल्याघरी पाऊल
४६२ मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला
--------- रावांचे गूण पाहून अर्पण केले मला
४६३ गीतेतं क्रुष्णाने अर्जुनाला केला उपदेश
------- रावांच्या बरोबर करते ग्रुहप्रवेश
४६४ चंद्राला पाहून हर्षित होते रोहिणी
------- रावांच्या जीवनात होईन मी आदर्श ग्रुहिणी
४६५ सासर आणि माहेर स्त्रीचे दोन नेत्र
------- रावांच्या नावाचे बांधते मणीमंगळसुत्र
४६६ संस्क्रुत भाषेत नदीला म्हणतात सरिता
------- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता
४६७ अम्रुतासाठी समुद्राचे झाले मंथन
------- रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
४६८ राधेच्या मनात क्रुष्णाचे चिंतन
------- रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण
४६९ चांदीच्या करंडयाला सोन्याचे झाकण
------ रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
४७० नववधुच्या करि शोभे हिरवे कंकण
------ रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण
४७१ सूनमूख पाहण्यासाठी आवश्यक असतो आरसा
------- रावांना घास घालते अनारसा
४७२ राम, लक्ष्मण, हनुमान त्यांचा दास
------- रावांसाठी मला निवडलं खास
४७३ नागनाथाच्या मंदीरात उदबत्तीचा वास
------- रावांना घालते लाडूचा घास
४७४ ता-याचं लुकलुकणं चंद्राला आवडलं
------- रावांसाठी मला निवडलं
४७५ चांदीच्या तबकात मोती होऊन राहण्यापेक्षा चातकाची भागवावी तहान
------- राव पती मिळाले म्हणून माझे जीवन झाले महान
४७६ सौभाग्यकांक्षिणी कालची झाले सुवासिनी आज
------- रावांनी दिला सारा सौभाग्याचा साज
४७७ आईनी वाढवलं, वडीलांनी पढवलं
------- रावांनी त्यांची होताच सोन्यानं मढवलं
४७८ गाण्याच्य़ा मैफलीत पेटीचा सुर
------- रावांची भेट म्हणजे प्रेमाचा पूर
४७९ सोन्याच्या तारेत गुंफली एकदाणी
-------- रावांचे नाव घेते ------- पंतांची तान्ही
480         लक्ष्मी माते वंदन करते मनी श्रध्देचे बळ
            ------- रावांच्या संसारी दे सम्रुध्दीचे फळ
४८१ जलाशयात असते जसे निर्मळ पाणी
तशीच मी ------- रावांची सहधर्मचारिणी
४८२ कोसळल्या जलधारा, धरा आनंदली रातोरात
-------- रावांच्या सहवासात होवो सौख्याची बरसात
४८३ संध्याकाळी तूळशीपाशी मंद ज्योत तेवते
------- दिवस म्हणून ------- रावांचे नाव घेते
४८४ सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश
------- राव हेच माझ्या जीविताचे परमेश
४८५ सरस्वतीच्या मंदीरात साहित्याच्य़ा राशी
------- रावांचे नाव घेते शुभमंगलदिवशी
४८६ दोन कुल उद्धरते कन्या एक कुल उद्धरतो पुत्र
------- रावांच्या नावाने बांधले मंगळसुत्र
४८७ मंगल झाली प्रभात, विहंग उडले गात
------- रावांच्या हाती दिला हात
४८८ संध्याकाळच्या चंदन गंधात अधिर झाली दिशा
-------रावांचे आयुष्य कळीकळीने उमलावे हीच माझी मनिषा
४८९ संसार सौख्याची मनामध्ये आस
------- रावांना घालते ------ चा घास
४९० राव आमचे मोठे करारी
म्हणून तर मी घेऊ शकले उंच भरारी
४९१ ज्याचा जसा भाव तशी भावना दिसते
------- ची प्रतिमा माझ्या मनी वसते
४९२ देवाजवळ सांयकाळी करेन देवाची आरती
------- राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी
४९३ कपाळावर कुंकु त्याखाली हळद सजते
हातावरच्या मेंदीत ------- रावांचे नाव रेखाटते
४९४ सुंदर काळेभोर केसात सजते गुलाबाचे फुल
------- राव क्षमा करतात माझी प्रत्येक भुल
४९५ प्रेम दयावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा
------- रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा
४९६ नीलवर्णी आकाशात मधुर पक्षांचा टाहो
------- रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य लाभो
४९७ जाई-जुईच्या वेलीखाली हरीण घेते विसावा
-------- रावांचे नाव घेते तुमचा आशिर्वान असावा
४९८ आई-वडिल करीत होते काळजी कसे मिळते घर
----- रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर
४९९ शुक्राची चांदणी ढगाला देते शोभा
------- रावांच्या पाठीवर परमेश्वर उभा
500        मोठयांचा करावा मान सन्मान
           ------- रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण
५०१ मन असावे स्वच्छ, प्रेमळ आणि पवित्र
------- रावांच्या जीवनात राहो आनंद सर्वत्र
५०२ कपाळाला कुंकु गळयात मोत्यांचा हार
------- रावांचे नाव घेताना आनंद होतो फार
५०३ सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान
------- रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान
५०४ पेटी वाजे वीणा वाजे सतार वाजे छान
------- रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान
५०५ सत्यम, शिवम, सुंदरम साहित्याची आस
------- रावांना घालते मी लाडवाचा घास
५०६ क्रुष्ण प्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहीले पत्र
------- रावांसाठी घातले मी मंगळसुत्र
५०७ आषाढात दाटले घन मोर नाचतो होऊन विभोर
------- रावांचे नाव घेते सर्वांसमोर
५०८ चालली सप्तपदीची सात पावले
------- रावांच्या नावाने मंगळसुत्र बांधले
५०९ भावनात जन्मली कल्पना फुल गुंफीले शब्दांचे
------- रावांचे नाव घेते मन राखून सर्वांचे
५१० प्राजक्ताच्या पायथ्याशी शुभ्र फुलांच्या राशी
------- रावांचे नाव घेताना मनात दाटली खूशी
५११ पुणेरी टांगा त्याला अरबस्तानी घोडे
------- रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे
५१२ देवाजवळ करीत होते दत्ताची आरती
------- राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी
५१३ जिरे साळीचा भात पिकतो मावळात
------- रावांचे नाव घेते----- च्या देवळात
५१४ चंद्राची जशी चंद्रीका, वसिष्ठांची जशी अरुंधती
तशीच मी होईन -------- रावांची आवडती
५१५ पानोपानी फुल फुलावे रंग गहिरे असावे
------- रावांच्या संसारात सुख माझे हसावे
५१६ शुभदिनी, शुभकाळी आली आमची वरात
------- रावांचे नाव घेते ------- च्या घरात
५१७ थंडगार पाण्याला वाळयाचा सुवास
------- रावांचे नाव घेते जोडी आमची खास
५१८ सोन्याचे मणी रेशमात गुंफले
-------- राव माझे वाचनात गुंतले
५१९ सागरतिरी शुभ्र वाळू
------- राव म्हणतात, चल राणी टेनिस खेळू
520        नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
          ------- रावांचे नाव आहे लाख रुपये तोळा
५२१ पौर्णिमेच्या दिवशी प्रुथ्वीवर पडतो चंद्राचा प्रकाश
ग्रुहलक्ष्मी सहभाग्यलक्ष्मी येवो ------- रावांच्या घरात
५२२ जीवनासाठी कला म्हणून कलेवर केली मात
कलात्मक जीवन जगण्यासाठी ------- रावांच्या हाती दिला हात
५२३ सूर छेडिता शब्द उमटले नवे
-------- रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य मला हवे
५२४ नभी उमटते सप्तरंगी इंद्रधनुष्य
------- रावांचे नाव घेते त्यांना मिळो दीर्घायुष्य
५२५ नवीन निघाल्या वाचून घ्यावा बोध
------- रावांच्या जीवनात लागला सुखाचा शोध
५२६ सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा
------- रावांचा आणि माझा साता जन्मांचा जोडा
५२७ जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा
------- रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा
५२८ लग्नानंतर प्रत्येक स्त्री होते जबाबदार
------- राव माझे दिसतात फारच रुबाबदार
५२९ राजहंस पक्षी खातो मोत्यांचा चारा
------- रावांच्या संसारात नाही दुःखाचा वारा
५३० काचेच्य़ा बशीत संत्र्याची फोड
------- रावांचे बोल अम्रुताहूनी गोड
५३१ चांदीच्या सुपात फणसाचे गरे
------- राव दिसतात बरे, पण वागवतील तेव्हा खरे
५३२ कौतुकी सासुसासरे, हौशी नणंद
------- रावांचे नाव घेताना होतो खुप आनंद
५३३ पाँलीस्टरचा कपडा कातरीने कापला
------- रावांच्या जीवनात मला आनंद वाटला
५३४ रोज माझ्या अंगणात रांगोळी सजते
-------- रावांच्या डोळयात माझेच प्रतिबिंब दिसते
५३५ विद्येचा नसावा आभिमान पैशाचा नसावा गर्व
------- रावांचे नाव घेते ऐकत राहा सर्व
५३६ भुंग्याच्या सहवासात विकसते कळी
------- रावांच्या साक्षीने लिहिते सौभाग्याच्या ओळी
५३७ असावे नेहमी हसतमुख बोलावे नेहमी गोड
------- रावांच्या संसाराला ------- ची लाभली जोड
५३८ मंगळ्सुत्राच्या दोन वाटया म्हणजे सासर माहेरचा संगम
------- रावांच्या सहवासाने झाला सौभाग्याचा उगम
५३९ बरेच दिवसांची आकांक्षा आज झाली साकार
------- रावांनी केलाय माझा पत्नी म्हणून स्वीकार
540        नेत्रीच्या निराजंनात तेवते प्रितीची फुलवात
           ------- रावांच्या साथीने संसाराला करते सुरवात
५४१ यौवनात पदार्पण केले सरले माहेरचे अंगण
------- रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण
५४२ संसाररुपी कांदबरीत रेखल्या भावनेच्या ओळी
------- रावांचे नाव घेते ------- च्या वेळी
५४३ सागराला भेटण्याकरिता खळखळत जाते सरिता
------- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता
५४४ लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी
------- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता
५४५ भवसागरात तरंगते संसाररुपी नौका
------- रावांचे नाव घेते सर्वजण ऐका
५४६ आहा रे जीवा करु नको हेवा
------- रावांच्या चरणांची करेन सेवा, तर मिळेल मोक्षाचा ठेवा
५४७ भक्तांच्या भेटीसाठी वेडा झाला नंदाचा नंदन
------- रावांचे नाव घेऊन मंगळागौरीला करते वंदन
५४८ घना निळा सुसाट वारा
------- राव छेडीती माझ्या ह्रदयाच्या तारा
५४९ सासरी आहेत माझ्या सासु-सासरे अन दीर
------- रावांना आवडते रव्याची खीर
५५० दोन वाती, दोन ज्योती, दोन शिंपले दोन मोती
------- रावांची राहो मी अखंड सौभाग्यवती
५५१ नयन रम्य बागेत नाचत होता मोर
------- रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर
५५२ नीलवर्ण आकाशात पक्षी उडाले सात
------- रावांची अन माझी जन्मोजन्मीची साथ
५५३ निळया निळया आकाशी उगवला शशी
------- रावांचे नाव घेते ------- च्या दिवशी
५५४ झुळझुळ वाहे चंद्रभागा, मंद चाले होडी
परमेश्वरा सुखी ठेव माझी अन -------- रावांची जोडी
५५५ चांदीच्या निरंजनात मनोभावे लावते फुलवात
------- रावांच्या सोबत करते सुखी जीवनाला सुरुवात
५५६ फुलात फुल जाईचे, प्रेमात प्रेम आईचे
------- राव आहेत माझ्या प्रितीचे
५५७ घरावर परडं, परडयात गहू
तुमच्या आग्रहासाठी ------- रावांचं नाव किती वेळा घेऊ
५५८ कांजीवरम साडी बनारसी खण
------- रावांचं नाव घेते आज आहे ------- सण
५५९ केस माझे कुरळे सावली पडली गालावर
------- रावांचे नाव घेते मैत्रिणींच्या बोलावर
560         टिळकांचा केसरी अत्र्यांचा ललकार
            ------- रावांची विदवत्ता हाच माझा अलंकार
५६१ कवींच्या कवितेत मोरोपंतांची आर्या
------- रावांचे नाव घेते ------- भार्या
५६२ गणेशाला आवडती रक्तवर्ण कमळे
------- रावांसोबत माहेर विसरुन रमले
५६३ चांदीच्या तबकात खडीसाखरेचे खडे
------- रावांचे नाव घेते गौरीहरापुढे
५६४ सातासमुद्रापलीकडे राधा-क्रुष्णाचा खेळ
------- रावांचे नाव घेते सांयकाळची वेळ
५६५ स्त्रियांचे कर्तव्य पतिसेवा हेच
------- रावांचे आयुष्य वाढो भुषण मला हेच
५६६ नेत्राच्या निरांजनात प्रितीची वात
------- रावांच्या नावास केली सुरुवात
५६७ रामाने राज्य दिले, भरताने नाकारले
------- रावांनी सौभाग्य दिले ते मी स्वीकारले
५६८ मणीमंगळसुत्र सौभाग्याची खूण
------- रावांचे नाव घेते------- ची सून
५६९ चांदीच्या तबकात हळदी कुंकवाचा काला
------- रावांच्या नावांस आरंभ केला
५७० भिल्लीणीच्या रुपाने शंकर झाले मोहीत
------- रावांचे नाव घेते सासुसास-यांसहीत
५७१ जय जवान जय किसान गर्जतो सारा देश
------- रावांच्या जीवाकरिता घातला सौभाग्याचा वेष
५७२ वडीलांचा आशिर्वाद मातेची माया
------- रावांसारखे पती मिळाले ही ईश्वराची दया
५७३ काँग्रेसच्या पायात सत्याग्रहाची बेडी
------- रावांच्या जीवावर घातली मंगळ्सुत्राची जोडी
५७४ दत्तात्रयाला शोभे गाय, महादेवाला शोभे नंदी
------- रावांच्या जीवावर मी आहे आनंदी
५७५ तुळशीला घालते पाणी, विष्णूची करते शांती
------- रावांचे आयुष्य वाढो हीच ईश्वराला विनंती
५७६ यमुनेकाठी क्रुष्ण खेळत होता बासरी
------- रावांमुळे आज मी आले सासरी
५७७ अंगणी टाकला सडा त्यावर घातली रांगोळी
------- रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी
५७८ ज्योतीला मिळेल ज्योत त्यात पडेल प्रकाश
------- रावांच्या जीवनात ठेंगणे होईल आकाश
५७९ गुलाबाचे फुल दिसायला छान
------- रावांचं नाव घेते ठेवते आपला मान
580        श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक
           ------- रावांच्या नावाने बेल वाहिला एकशे एक
५८१ इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास
------- रावांचे नाव घ्यायला वाटत नाही त्रास
५८२ विदयेचे माहेरघर आहे म्हणतात पुणे
------- रावांच्या संसारात नाही मला उणे
५८३ गुलाबाच्य़ा फुलांचा लाजवाब सुगंध
------- रावांना केले मी ह्रदयात बंद
५८४ तानाजी शिवाजी जिवलग मित्र
------- रावांनी आणले माझ्यासाठी मंगळसुत्र
५८५ चांगली पुस्तके आहेत माणसाचे मित्र
------- रावांच्या सहवासात रंगविले संसाराचे चित्र
५८६ ज्ञानदानाने करते मी कर्तव्यपुर्ती
------- रावांच्या शब्दांनी मिळते मला स्फुर्ती
५८७ गीतात जसा भाव, फुलात तसा गंध
------- रावांबरोबर जुळले रेशमी बंध
५८८ महादेवाच्या मंदीरात उदबत्तीचा वास
------- रावांना घालते करंजीचा घास
५८९ श्रावणधारेच्या वर्जवाणीत प्रुथ्वी बनते अंजली
------- रावांच्या सहवासात मी तुळस रंगविली
५९० नेत्राचे निरांजन लावते पापणीच्या ताटी
------- राव आणि माझ्या ऋणानुबंधाच्या गाठी
५९१ माप ओलांडून ग्रुहप्रवेश करते
------- रावांचे नाव घेऊन सौभाग्य मागते
५९२ नीलवर्णी आकाशात  लागली चाहूल
------- रावांच्या संसारात पडले पहिले पाऊल
५९३ सासरचे निरांजन माहेरची फुलवात
------- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात
५९४ कोल्हापूरच्या देवीपूढे हळदी कुंकवाच्या राशी
------- रावांचे नाव घेते --------- च्या बारशाच्या दिवशी
५९५ विजेचे वर्तन ढ्ग करती गडगड
------- रावांचे नाव घेताना होई माझी गडबड
५९६ श्याम सावळा सखा भक्तांचा कैवारी
जीवन माझे सुखी ------- रावांच्या संसारी
५९७ संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी
------- रावांचा उत्कर्ष होवो हेच मागणे हो देवापाशी
५९८ निसर्गाला नाही आदि आणि अंत
------- राव आहेत मला मनपसंद
५९९ सदसदविवेक बुध्दिला असे शिक्षणाचे  वरदान
------- रावांच्या संसारात देईन सर्वाना मान
600        कोजागिरी पौर्णिमा नी शरदाचे चांदणे
            ------- राव आहेत सर्वात देखणे
६०१ रामाने केला शिवधनुष्य भंग
------- रावांच्या जीवनात झाले मी दंग
६०२ श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून
------- रावांच्या नावाने आले माझे सौख्य फिरुन
६०३ सागराच्या ह्रदयी अंतरंग लपले
------- रावांसाठी जीवन सर्वस्व अर्पिले
६०४ शशी-रजनी, रवी-उषेची नियतीने बांधली जोडी
------- रावांच्या संसारात आहे प्रेमाची गोडी
६०५ वरण भातावर धरली साजूक तूपाची धार
------- रावांना घास देताना तारांबळ झाली फार
६०६ शब्द पाकळया मुक झाल्या ओठीचे उडले स्वर
------- रावांबरोबर चालले सुखी होवो माहेर
६०७ निरोपाच्या प्रागंणात पडला स्म्रुती पुष्पाचा सडा
------- रावांच्या सोबत चालले घेऊन आशिर्वादाचा घडा
६०८ चंद्रतारांगणाच्या मेळाव्यात रजनी हसते
------- रावांच्या सहवासात ------- रमते
६०९ वसंत ऋतुत कोकीळा गाणे गातात
------- रावांच्या सहवासात दिवस आनंदात जातात
६१० नीलवर्ण आकाशात वीज कडाडली ढगात
------- रावांच्या सहवासात धन्य झाले मी जगात
६११ नीलवर्ण आकाशात चमकतात चांदण्या
------- रावांचे नाव घेते --------- ची कन्या
६१२ आंब्याच्या झाडाला आंबे लागले शंभर
------- रावांचे नाव घेते माझा पहिला नंबर
६१३ सोन्याची घागर अम्रुताने भरावी
------- रावांची सेवा जन्मभर करावी
६१४ गंगा वाहे यमुना वाहे सरस्वती झाली गुप्त
------- रावांच्या पदरी घालून आई बाबा झाले मुक्त
६१५ तुकारामाने केले अंभग, मोरोपंतानी केली आर्या
------- रावांची कन्या झाली ------- रावांची भार्या
६१६ शिवाजी राजांची जिजाई होती माता
------- रावांचे नाव घेऊन येते मी आता
६१७ वेंकटेशाच्या देवळाला सोन्याचे दार
------- रावांना घालते पुष्पहार
६१८ चातक पक्षी पावसाचे पितो पाणी
------- रावांची झाली मी राणी
६१९ चांदण्या रात्री रातराणीचा सुवास
------- रावांचे नाव घेते खास
620         पंढरपुरच्या यात्रेत हरीनामाचा गजर
           ------- रावांचे नाव ऐकण्यासाठी सर्वजण हजर
६२१ श्रीक्रुष्णाच्या गळयामध्ये वैजयंतीमाला
------- रावांचे नाव घेते मंगल दिन आला
६२२ आरक्त गालावर उमटले लज्जेचे भाव
------- रावांनी घेतला माझ्या अंतःकरणाचा ठाव
६२३ सकाळच्या वेळी बागेत फुल तोडतो माळी
------- रावांचे नाव घेते आता तुमच्यावर आली पाळी
६२४ यमुनेच्या तीरावर ताजमहालाची इमारत
------- रावांचे नाव घेण्यास नाही मी हरत
६२५ महादेवाच्या पुढे असतो नंदी
------- रावांचे नाव घेऊन देते तुम्हांला संधी
६२६ पहाटेच्या वेळी वारा वाहतो झुळझुळ
------- रावांचे नाव घेताना पैजंण वाजतात खुळ्खुळ
६२७ चांदीच्या तांब्याला नागाची खुण
------- रावांचे नाव घेते ------- रावांची सून
६२८ हिरवी बांगडी गुलाब दास
------- रावांच्या ताटापूढे अत्तराचा वास
६२९ लाज-या राधिकेला कन्हैया म्हणतो हास
------- रावांना घालते लाडवाचा घास
६३० वसंत ऋतुत कोकीळा करते कुंजन
------- रावांच्या बरोबर करते लक्ष्मीपुजन
६३१ चंद्राभोवती तारकांनी धरले गोल अंगण
------- रावांच्या नावाने बांधले मी कंकण
६३२ जमीन दुभंगुन सीता झाली गुप्त
------- रावांनी हार घालुन आईवडिलांना केले मुक्त
६३३ अम्रुत मुर्तीला स्वरुप देतो कलाकार
------- रावांचे सदगुण हेच माझे अलंकार
६३४ हळद लावते किंचीत कुंकु लावते ठसठशीत
------- रावांसारखे पती मिळाले हेच माझे पूर्व संचित
६३५ सीतेच्या पर्णकुटीत लावल्या केळी
------- रावांचे नाव घेते पुजेच्या वेळी
६३६ मेघरुपी पिंपातून टपटप पडतात मोती
------ रावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानू किती
६३७ रुसलेल्या राधेला क्रुष्ण म्हणतो हास
------- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
६३८ संसाररुपी देवळात नंदादीप तेजावा समाधानाचा
------- रावांच्या पाठीशी आशिर्वाद असावा तुमचा
६३९ यमुनेच्या डोहात क्रुष्णा वाजवी पावा
------- रावांच्या जीवावर संसार सुखाचा व्हावा
640         आशिर्वादाची फुले वेचते वाकुन
             ------- रावांचे नाव घेते आपला मान राखून
६४१ दत्तात्रयाचा अवतार ब्रम्हा, विष्णू, महेश्वर
------- रावांशी जुळले जीवनावे स्वर
६४२ दया, क्षमा, शांती हेच सतीचे माहेर
------- रावांच्या चरणावर केला पंचप्राणांचा आहेर
६४३ गौतमाची गौतमी, वसिष्ठांची अरुंधती
------- रावांची मी सौभाग्यवती
६४४ ह्रदयरुपी शिंपल्यात प्रितीचे पाणी
------- रावांच्या नावाने बांधले मंगळमणी
६४५ मंगळसुत्र हा सौभाग्याचा अलंकार
------- रावांच्यासह ध्येय आशा होवोत साकार
६४६ मंगळसुत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा
------- रावांचे नाव घेऊन मान राखते सर्वांचा
६४७ देवीच्या देवळात भोपी खेळतो पोत
------- रावांनी बांधली माझ्या गळयात मंगळसुत्राची पोत
६४८ मंगळसुत्र हेच बायकांचे लेणे
------- रावांकरिता स्विकारले ------- घराणे
६४९ अलंकारात अलंकार श्रेष्ठ मंगळसुत्र
------- रावांच्या हाती माझे जीवनसुत्र
६५० शिवाजीसारखा राजा गादीवर बसावा
------- रावांचे नाव घेते आशिर्वाद असावा
६५१ भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायाला ओवाळीन
------- रावांचे नाव घेते --------- ची बहिण
६५२ अत्तरदाणी गुलाबदाणी विडे ठेवले करुन
------- रावांना माळ घातली कुलदेवतेला स्मरुन
६५३ सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चूडे
------- रावांचे नाव घेते मंगळागौरीपुढे
६५४ गुलाबाचे फुल गणपतीला वाहिले
------- रावांचे जीवनासाठी पुणे शहर पाहिले
६५५ सांबाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार
आणि ------- रावांच्या जीवासाठी केला संसार
६५६ मोत्याचे पेले पाहून चंद्र सुर्य हसे
जमलेल्या मंडळीत ------- राव खासे
६५७ काळया चंद्रकलेवर ता-यांसारख्या टिकल्या
------- रावांच्या मळयात खूप तूरी पिकल्या
६५८ सागवान पेटीला सोन्याची चूक
------- रावांच्या हातात कायदयाचे बूक
६५९ लहानश्या भिंती चित्रे काढू किती
सासुबाईच्या पोटी -------- राव मोती
660          दस-याच्या सणाला केला साखरभात
            ------- रावांचे नाव घेते --------- पंतांची नात
६६१ कँप्टन लक्ष्मी नेताजी सुभाषचंद्र बोस
------- रावांचे नाव घेऊन जयहिंदचा करु घोष
६६२ दवबिंदुचा जन्म आहे विरण्यासाठी
------- रावांशी लग्न केले मी सुख जोपसण्यासाठी
६६३ आल वारा, गेला वारा रुपये घ्या पारखून
राजाच्या दरबारी --------राव कारकून
६६४ पूण्यात जन्मले, गंगेत न्हाले
आणि -------- रावांच्या जीवासाठी मुबंईत आले
६६५ सोन्याची पेटी सदरेला दाटी
------- राव बसले पेढीवर तेथे राजा आला भेटी
६६६ पाण्याच्या हंडयावर फुलांचे झाकण
------- रावांच्या हातात सोन्याचे कंकण
६६७ झिरी मिरी पाऊस लागे मोत्यांच्या धारा
------- रावांच्या छत्रीला मोत्यांचा तुरा
६६८ गंधाने भरली कपोळ त्यात पडली समुर
आणि ------- च्या घराण्यात -------- राव चतुर
६६९ दारी होती तुळस तिला घालीत होते पळी पळी पाणी
आधी होते आई-बाबांची तान्ही, मग झाले -------- रावांची राणी
६७० साजुक तुपात नाजुक चमचा
-------- रावांचे नाव घेते आग्रह तुमचा
६७१ अबोलीचा गजरा रुपयाला एक
-------- रावांचं नाव घेते -------- घराण्याची लेक
६७२ ज्याचा जसा भाव तसा त्याला देव दिसे
-------- रावांची प्रतिमा नेहमी माझ्या मनी वसे
६७३ शुटींग, शर्टींग, कटपिसेस
-------- राव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस
६७४ सुर्याला कुणी म्हणतात रत्नाकर, कुणी म्हणतात भास्कर
--------  राव माझे जन्मोजन्मीचे प्रियकर
६७५ संसार रुपी करंडा मनोरुपी झाकण
-------- रावांचे नाव घेते आर्शिवाद द्यावा आपण
६७६ एकदानी केली बिंदी केली करायची राहिली सरी
-------- रावांच्या नावासाठी काळी पोत बरी
६७७ शेगावच्या गजानना वंदन करते तुला
-------- रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला
६७८ मंदिरात वाहते फुल आणि पान
-------- रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान
६७९ चंद्राचा झाला उदय अन समुद्राला आली भरती
-------- रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती
680          वसंतातील डाळ पन्हं देती थंडावा
             -------- रावांसह मला आपला आर्शिवाद हवा
६८१ श्रीक्रुष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन
-------- रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन
६८२ जीवन रुपी कांदबरी वाचली दोघांनी
-------- रावांचे नाव घेते पत्नी या नात्यानी
६८३ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला बरवा
--------राव बसले पुजेला मी निवडते दुर्वा
६८४ असा असावा सुखी संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागे माघार
-------- राव आहेत माझ्या जीवनाचा आधार
६८५ तानसेन मेघ बरसण्यासाठी आळवित असे मेघ मल्हार
--------रावांसारखे प्रेमळ पती लाभले मला सहचर
६८६ घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तुळस
-------- रावांच्या नावाचा संसारावर चढवीन कळस
६८७ कुंकू लावते ठळक हळद लावते किंचीत
-------- रावांचं नाव घेते हेच माझं संचित
६८८ महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड
-------- रावांचे बोलणं साखरेहुन गोड
६८९ गर्व नसावा श्रीमंतीचा अभिमान नसावा स्वरुपाचा
--------रावांचे नाव घेते संसार करेन सुखाचा
६९० रुसलेल्या राधेला क्रुष्ण म्हणतो हास
-------- रावांचे नाव घेते आज दिवस आहे खास
६९१ शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने
-------- रावांचे नाव घेते प्रेमभाव भक्तीने
६९२ संसाररुपी सागरात उसळल्या लाटा
-------- रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा
६९३ एका वाफ्यातील तुळस दुस-या वाफ्यात रुजवली
-------- रावांची सारी माणसे मी आपली मानली
६९४ श्रीक्रुष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य
-------- राव आणि माझ्या संसारात होईल तुमचे आदरातिथ्य
६९५ शिवाजीला जन्म देणारी धन्य जिजाऊ माता
-------- रावांचे नाव घेते आपल्या शब्दाकरीता
६९६ जीवनात ही घडी अशीच राहू दे
-------- रावांची प्रीत सदैव अशीच फुलू दे
६९७ माहेरचे निरांजन  सासरची वात
-------- रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात
६९८ कुलदेवतेला स्मरुन वंदन करते देवाला
-------- रावांचे सौभाग्य अखंड दे मला
६९९ संसारात स्त्रीने नेहमी रहावे दक्ष
-------- रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष
700           चांदीच्या ताटात लावते तुपाची फुलवात
              --------रावांचे नाव घेऊन आजपासुन करते संसाराला सुरुवात
७०१ -------- रावांच्या प्रेमाला जगात नाही तोड
प्रभुच्या चरणी प्रार्थना शेवट व्हावा गोड
७०२ फुलफळांनी बहरलेली बाग सर्वानाच आवडे
-------- रावांचे नाव घेण्यात अविट गोडी वाटे
७०३ नेत्रांच्या निरांजनात प्रितीची वात
-------रावांचे नाव घेऊन संसाराला करते सुरुवात
७०४ नील नभांगण जणु अंगठी, चंद्र शोभे त्यातला खडा
ईश्वर सदा सुखी ठेवो -------- राव नी माझा जोडा
७०५ नको मोहन माळ, नको हि-यांचा हार
-------- रावांच्या जीवनात मी सुखी फार
७०६ नाव घ्या नाव घ्या आग्रह कशासाठी
-------- रावांचे नाव होते ओठावरती पण थांबले होते अखण्यासाठी
७०७ ज्यांच्या सर्व्हिसला होल वर्ल्ड इज रेडी
-------- रावसाहेबांची मी ब्युटी फुल लेडी
७०८ शाळेच्या ग्राऊंडवर खेळत होते गेम
तिकडुन आले -------- राव त्यांनी विचारले व्हाँट इज युवर नेम
७०९ सुशील माझे सासु सासरे सुशील माझे माता पिता
-------- रावांचे नाव घेते -------- ची मी माता
७१० वैचारीक प्रगल्भतेचे -------- राव मला लाभले
म्हणूनी जीवनी स्वप्न माझे साकारले
७११ विचाराने सरळ मनाने निर्मळ -------- राव मला लाभले
सुर ताल मिळाल्याने जीवनी स्वर्ग अवतरले
७१२ सप्तपदीच्या सात पावलांनी केली संसाराची नांदी
-------- रावांच्या संसारात राहीन मी आनंदी
७१३ भवसागरात तरंगते संसाररुपी होडी
लक्ष्मीच्या क्रुपेने सुखी राहो -------- व -------- ची जोडी
७१४ विनय हाच खरा स्त्रीचा अलंकार
-------- रावांच्या सहवासात होवो ध्येय-आशा साकार
७१५ भुंग्याच्या सहवासात विकसते कळी
-------- रावांचे नाव घेते -------- च्या वेळी
७१६ मंगळागौरीपुढे हळदी कुंकवाच्या राशी
-------- रावांचे नाव घेते -------- च्या दिवशी
७१७ द्राक्षाच्या वेलीचे त्रिकोणी पान
-------- रावांचे नाव घेते राखते सर्वांचा मान
७१८ तबला वाजे, पेटी वाजे, छान वाजे वीणा
-------- रावांचे नाव घेते वन्दे मातरम म्हणा
७१९ लग्न करुन आनंदाने संसार करते सुरु
-------- राव आहेत माझे प्राणपाखरु

७२० महादेवाला बेल, विष्णुला तुळस
-------- रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस
७२१ रानातील मेवा पोपटाने खावा
-------- रावांसारखा पती जन्मोजन्मी मिळावा
७२२ लागताच वसंत ऋतुची चाहूल स्रुष्टी गेली खुलून
-------- रावांमुळे जीवन गेले माझे बहरुन
७२३ खारकेच्या झाडावर चढला दोडक्याचा वेल
-------- रावांचे नाव घेते वाचवा इंधनाचे तेल
७२४ म्रुगाच्या पावसाने पालटले वनश्रीचे रुप
-------- रावांचे नाव घेते व्रुक्षारोपण करुन वाचवा जमीनीची धुप
७२५ रंगात रंग काळा, निळा, जांभळा, पिवळा
-------- रावांचे नाव घेते वेळेचे बंधन पाळा
७२६ कुबेराच्या भांडारात हिरे-माणकांच्या राशी
-------- रावांचे चरण हीच माझी आयोध्या काशी
७२७ चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
-------- रावांच्या राणीला मोत्यांचा चुडा
७२८ दारापुढे व्रुंदावन त्यात तुळशीचे झाड
-------- रावांच्या गुणापुढे दागिन्यांचा काय पाड
७२९ शंकराच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार
-------- रावांच्या जीवासाठी केला संसार
७३० युध्दामध्ये युध्द झाले महाभारती
-------- रावांच्या संसारात मी आहे सारथी
७३१ आई वडीलांनी दिला जन्म, ब्रह्मदेवांनी बांधल्या गाठी
माहेर सोडले -------- रावांच्या सौख्यासाठी
७३२ राम गेले वना, राज्य दिले भरता
-------- रावांचे नाव घेते सर्वांकरीता
७३३ शंकरासारखा पिता अन गिरजे सारखी माता
-------- रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता
७३४ सव्वाकोस पसरला अंगरख्याचा घोळ
-------- रावांचे अक्षर जशी मोत्याची ओळ
७३५ गणेशाच्या प्रेमाने सगळी विघ्न पळती
-------- रावांचे प्रेम पाहुन सवती मनात जळती
७३६ चंदनाचे पाट त्याला सोन्याचे हुक
-------- रावांच्या हातात इंग्रजी चौथीचे बुक
७३७ सत्य अहिंसा बापुंचे गिरवा धडे
-------- रावांचे नाव घेते ऐका बाई गडॆ
७३८ लवंगीवाडी, बदामी बंगला
-------- रावांच्या प्रपंचात जीव माझा रंगला
७३९ चांदीच्या भांडयात केशराचे पाणी
-------- रावांसारखा हूशार नाही कोणी

७४० अप्सरा मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला
-------- रावांचे गुण बघून अर्पण केली मला
७४१ तारामती राणी, हरिशचंद्र राजा, रोहिदास पुत्र
-------- रावांच्या नावाने घातले मंगळसुत्र
७४२ वाद्यामध्ये सुरेल वाद्य म्हणते बिन
-------- रावांच्या चरणी -------- बाई लीन
७४३ संगमरवरी देवळात बसविली रामाची मुर्ती
-------- रावांशी लग्न झाले झाली इच्छापुर्ती
७४४ शिवाजीसारखा पुत्र, जिजाबाईसारखी माता
-------- रावांचे नाव घेते आपणा सर्वांकरीता
७४५ आधी घातला चंद्र्हार, मग घातली ठुशी
-------- रावांचे नाव घ्यायला माझी नेहमीच खुशी
७४६ आपल्या देशात व्हावयाचा आपल्या भाषेचा मान
-------- रावांचे नाव घेते ऐका देऊन कान
७४७ देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले
-------- रावांशी लग्न होऊन मनोरथ पुर्ण झाले
७४८ विवेकी लोकांच्या समुदयात विद्वांनाचा मान
-------- रावांचे नाव घेते ऐका देऊन कान
७४९ सासर-माहेर घराणे आहे कुलीन
-------- रावांच्या सहवासात मी राहीन लीन
७५० स्त्रीला भुषविते तिची शालीनता
-------- रावांच्या सहवासात करीन कर्तव्यतत्परता
७५१ सागर मिलनास उत्सुक होते सरिता
-------- रावांच्या जीवनात सौभाग्याची पुर्तता
७५२ रुप गुण संपदेच्या जोडीला हवे चारित्र्य
-------- रावांच्या नावात आहे पावित्र्य
७५३ अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान
-------- रावांच्यामुळे मिळाला सौभाग्याचा मान
७५४ सडा समार्जनाबरोबर तुळशीला घालावे पाणी
-------- रावांचे नाव घेते जमल्या सा-या मैत्रिणी
७५५ प्रभात समय सुखावतो गाता भुपाळी
-------- रावांचे नाव घेते -------- च्या वेळी
७५६ संध्या समयास आतुरलेले जीव घरी घेतात धाव
सर्वांच्या आग्रहास्तव घेते -------- रावांचे नाव
७५७ मनाला समाधान देते देवापुढची सांजवात
संसाराच्या सुखी वाटचाली करीता -------- रावांच्या हाती दिला हात
७५८ तिळगुळाच्या देवघेवीनं द्रुढ होतं प्रेमाचं नातं
-------- रावांचे नाव घेते आज आहे मकर सक्रांत
७५९ तिळाची माया गुळाची गोडी
परमेश्वरा सुखी ठेव -------- राव नी माझी जोडी

७६० भुतदया आहे संताची शिकवण
-------- रावांच्या ह्रदयी प्रितीची साठवण
७६१ नुतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा
-------- रावांच्या सानिध्यात राहो सदैव गोडवा
७६२ वसंत चाहूली हळदी कुंकु करतात सुवासिनी
-------- रावांनी भरला आनंद जीवनी
७६३ सावित्रीच्या पुण्याईने सत्यवानाला मिळाला पुनर्जन्म
-------- रावांचे सौभा़ग्य  छ्त्र लाभॊ जन्मोजन्म
७६४ पंचमीचा सण आला की हलतात हिंदोळे
-------- रावांच्या सहवासात माझे आनंदी मन खेळे
७६५ माहेरच्या मायेला नाही कशाची सर
-------- रावांच्या सहवासात न वाटे कसली कसर
७६६ श्रावण महिना म्हणजे सणांची सुरुवात
------- रावांचे नाव घेते वरात आली घरात
७६७ श्रावणात हिरवा साज स्रुष्टिदेवी सजली
-------- रावांच्या सौख्यास्तव मंगळागौर पुजली
७६८ वर्षाऋतुच्या आगमनाने प्रसन्न झाली धरती
------- रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या रात्री
७६९ सौभाग्याची जीवन ज्योत प्रीत तेलाने तेवते
------- रावांना दिर्घायुष्य मंगळगौरीस मागते
७७० शुभदिनी मंगलकाली मंगलमुर्ती ये घरा
------- रावांच्या जीवनात भाग्योदय खरा
७७१ दस-याचे महत्व सिमोलंघनात
------- रावांच्यासह सुखी जीवनी नंदनवनात
७७२ वैशाखाच्या महिन्यात उन्हाळयाचा जोर
-------- घराण्यात ------- राव पुरुष थोर
७७३ श्रावणाच्या महिन्यात जिकडे तिकडे पाणी
------- रावांच्या भेटीसाठी आतुर चातकावाणी
७७४ दरवळतोय घरात माझ्या अत्तराचा सुगंध
------- रावांचा सहवास करतोय मला धुंद
७७५ मखमली शेजेवर अत्तराचे सिंचन
करते सदा मनामध्ये ------- रावांचे चिंतन
७७६ श्लोक रामदासांचे आहेत किती छान
------- रावांच्या संसारात हरवले मी भान
७७७ लांबसडक वेणीवर शोभे गुलाबाचे फुल
------- रावांना पहाताच पडलीय मला भुल
७७८ चांदीच्या समईत रेशमाची वात
------- रावांबरोबर करते संसाराला सुरुवात
७७९ सारंच गेलय बदलुन माझं नावही नवं
------- रावांनी दिलं मला सर्वच जे हवं

७८० मंगळागौरीसाठी जमवली सोळा प्रकारची पत्री
------- रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या रात्री
७८१ नको सोनं, नको मोती, नको मला चंद्रहार
------- रावांचे ज्ञान नी कर्तुत्व हेच माझे अलंकार
७८२ खुप पाहिली तीर्थक्षेत्र, पवित्र वाटते काशी
------- रावांचे नाव घेते -------- च्या दिवशी
७८३ केतकीच्या वासाने नाग होतो धुंद
------- रावांमुळे सारं घडलं पण शब्द नाहीत आभारा
७८४ इंद्रधनुच्या झुल्यावर मन झोके घेई
------ रावांच्या संसारी बालक्रुष्ण येई
७८५ ताटभर दागिन्यांपेक्षा माणसे असावी घरभर
------- रावांचे नाव घेते आर्शीवाद द्यावा जन्मभर
७८६ कोकिळाच्या कुंजनाने लागते वसंताची चाहूल
------ रावांबरोबर टाकते संसारात पाऊल
७८७ द्राक्षाच्या वेलीची दाट पसरते सावली
------ रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
७८८ देशाच्या स्वातंत्र्यासाठी विरांनी घेतली उडी
------ रावांच्या नावाने गळयात बांधते मंगळसुत्राची जोडी
७८९ देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांना झाली शिक्षा
------ रावांकडे मागितली मी सौभाग्याची भिक्षा
७९० देवा ब्राम्हणांच्या साक्षीने घेतला माझा हातामध्ये हात
------ रावांची लाभली मला साता जन्माची साथ
७९१ झाड डोले, वेल डोले, डोलतो वनश्री
------- रावांचे नाव घेऊन झाले मी भाग्यश्री
७९२ प्रेमळ माझे आई वडील, वत्सल सासु सासरे
------- रावांच्या घरी येणार आता तारे हसरे
७९३ निलमणी आकाशात चंद्राची प्रभा
------- रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा
७९४ सुवासिनीचं पहिल व्रत मंगळागौरीची पुजा
------- रावांचे नाव घेणं म्हणजे गोड सजा
७९५ निलमणी आकाशात लक्ष्मी करते वास
------- रावांना घास घालते करंजीचा घास
७९६ चंद्र सुर्य नक्षत्रांनी शोभा येते नभाला
------- रावांच्या प्रेमाचा सुगंध माझ्य़ा मनाला
७९७ सरस्वतीच्या देवळात तांदुळाच्या राशी
------- रावांचे नाव घेते -------- च्या दिवशी
७९८ प्रसन्न माझे घरकुल साधे, इथे शांती नांदे
------- राव मला पती लाभले भाग्य थोर माझे
७९९ रात्री फुलराणी देते सुगंध
------- रावांच्या जीवनात नेहमीच असतो आनंद

८०० करी बांधल्या कंकणासवे आले मी या घरी
------- रावांच्या संगतीत मी त्रुप्त सदा अंतरी
८०१ उत्तम कुळी जन्मले उच्च कुळी आले
------- रावांचे नाव घेऊन भाग्यशाली झाले
८०२ प्राण्यात प्राणी हत्ती हा लठ्ठ
------- रावांचे नाव घेण्यासाठी -------- चा हट्ट
८०३ -------- भाजीला सुवासिक मसाला
------- रावांचे नाव घ्यायला आग्रह कशाला
८०४ द्राक्षांच्या वेलीखाली चरत होती हरणी
आई वडिलांनी अर्पण केले ------- रावांच्या चरणी
८०५ सुशील सासुकडे पाहुन आईची नाही येत आठवण
------- रावांच्या संगतीत सुख सम्रुध्दीची साठवण
८०६ आगगाडीची शिटी, मोटारीचा भोंगा, सायकलची घंटी
------- रावांच्या गळयात सोन्याची कंठी
८०७ हिरवी साडी बुटटयाची खण
------- रावांचे नाव घेते -------- चा सण
८०८ पारिजातकाचे फुल मधोमध पिवळे
------- रावांचे रुप श्रीक्रुष्णासारखे सावळे
८०९ थेंबाथेंबाची रांगोळी शेवटच्य़ा थेंबापर्यत जोडावी
------- रावांची साथ मला जन्मोजन्मी मिळावी
८१० चकोराला असते चांदण्याची साथ
------- रावांना देते -------- चा घास
८११ बंधनात असते अवीट गोडी
म्हणून ------- रावांनी आणि मी घालून घेतली लग्नाची बेडी
८१२ हिमालय पर्वतावर मोरांनी फोडला टाहो
------- रावांचे नाव नेहमी माझ्या ह्रदयात राहो
८१३ नाही कशी म्हणू तुम्हा घेते मी नाव
------- रावांच्या बाळाला दिले तुम्ही गोड नाव
८१४ काँलेजमध्ये असतानाच ------- रावांनी मला हेरलं
शिक्षण संपल्याबरोबर त्यांनी मला वरलं
८१५ पाच पांडव सहावी द्रोपदी सती
------- रावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानू किती
८१६ मित्रांच्या घोळक्यातुन उठून दिसते स्वारी
------- रावांची झाली मी भाग्यवती खरी
८१७ दहातून दहा गेले बाकी राहिली शून्य
------- रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य
८१८ कोजागिरीच्या चांदण्यात हाती घेतला हात
------- राव देणार मला जन्मभराची साथ
८१९ स्त्रियांच्या जातीने नम्रतेने वागावे
------- रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे

८२० सासु-सास-यांची छाया, आई वडिलांची माया
मी तर आहे ------- रावांची जाया
८२१ ज्ञानेशांची ओवी, मोरोपंताची आर्या
मी तर आहे ------- रावांची भार्या
८२२ नव्या नवरीचा आज उतरला साज
ख-या अर्थाने ग्रुहिणी ------- रावांची झाले आज
८२३ सहवासाने वाढते संसारात रंगत
------- रावांचे नाव घेताना वाटते मला गंमत
८२४ चांदीची चुल सोन्याचा विस्तव
------- रावांचे आले दोस्त तर माडीवर जाऊन बस
८२५ या झाडावरुन त्या झाडावर उडत होते पक्षी
------- रावांचे नाव घेते चंद्र सुर्य साक्षी
८२६ पुणं तिथं काय उणं म्हणतात सारी जणं
------- रावांनी केलं सार्थ माझं जिणं
८२७ नको मला सोनं चांदी, नको मला शालु शेला
------- रावांच्या जीवनासाठी देह अर्पण केला
८२८ भ्रमराच्या गुंजारवे मुग्ध झाली कमलिनी
------- रावांची पत्नी झाले आजच्या शुभदिनी
८२९ थोडा गुण सोन्याचा, थोडा गुण सोनाराचा
------- रावांनी केला माझा संसार सुखाचा
८३० तांब्याच्या घागरी चकचक घासल्या
------- रावांच्या बहिणी तबला पेटीवर नाचल्या
८३१ राम, लक्ष्मण, सीता तीन मुर्ती साक्षात
------- रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात
८३२ संसारात करावी लागते सगळयांनाच तडजोड
पण ------- रावांची लाभली छान मला जोड
८३३ आता निघाल्या प्लास्टीकच्या खुर्च्या
------- रावांच्या बहिणी जशा खुरासनी मिरच्या
८३४ माहेत सोडून येताना डोळयात आसू
------- रावांच्या प्रेमळ संसारात ओठावर असतं हासु
८३५ सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा
------- राव सुखी राहोत हिच माझी इच्छा
८३६ पुजा केली मनोभावे, गौराई म्हणे काय हवे
------- राव नी माझ्य़ा संसाराला देवी तुझे आशीर्वाद हवे
८३७ दाग नको, दागिना नको, नको चंद्रहार
------- रावांचं नाव हाच माझा अलंकार
८३८ परिसाच्या संगतीने झाले लोखंडाचे सोने
------- रावांच्या क्रुपेने लाभले सौभाग्याचे लेणे
८३९ मंगळसुत्राच्या वाटयांनी जोडले सासर माहेर
------- रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

८४० विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
------- रावांच्या छायेत झाले मी ही भाग्यवंत
८४१ ऋण काढून सण करणे आहे दुषण
------- रावांचे नाव हेच माझे भुषण
८४२ संसाराच्या आमच्या कसलीच नाही वाण
------- राव म्हणजे रुप-गुणांची खाण
८४३ क्रुष्ण म्हणतो राधेला आता जरा हास
------- रावांना घालते ------- चा घास
८४४ गौतमाच्या शापाने अहिल्या झाली पाषाण
------- रावांचे नाव घेते सौभाग्य हेच माझे निशाण
८४५ शरदाच्या चांदण्यात चंद्र करतो अम्रुताचा वर्षाव
------ रावांच्या यशाने झालाय त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव
८४६ सासु-सास-यांच्या छायेत मला नाही कशाची कमी
------ राव हेच माझे सर्वस्वाचे स्वामी
८४७ चांदीच्या अडकित्याला हिरेमोती जोडले
------ रावांसाठी आई वडिल सोडले
८४८ ------ रावांच्या कर्तुत्वाची पाहून चढती कमान
त्यांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान
८४९ राम, लक्ष्मण, सीता तिघे निघाले वनी
------- रावांचे नाव पडो सर्वांच्या कानी
८५० निसर्गाला कधी नाही अंत
------- राव आहेत मला मनपसंत
८५१ सर्वस्वाचे देऊन दान मुक्त मी झाले
------- रावांच्या सहवासात आनंदाने न्हाले
८५२ घराला होती खिडकी, खिडकीत होती वीट
------- रावांना झाली दिठ तर चपलीत केली नीट
८५३ चेहरा आहे मानवी मनाचे दर्पण
------- रावांना केले मी सर्वस्व अर्पण
८५४ सुखी माझ्या संसार वेलीवर डोलताहेत दोन सुंदर फुलं
------- रावांनी माझ्या सुखाचं केलं नव दालन खुलं
८५५ मातापित्यानी वाढवलं मनासारखे शिक्षण दिलं
सर्व सुखाच्या संसारात ------- रावांनी मला स्वामिनी केलं
८५६ अजान व्रुक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचून केली किर्ती
------- रावांचे नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी
८५७ छोटसं घरकुल माझं सामावून घेते सा-यांना
------- रावांची प्रेमळ साथ त्रुप्त करते मनाला
८५८ हळद लावते कुंकु लावते वाण घेते घोळात
------- रावांचे नाव घेते सवासिनींच्या मेळयात
८५९ वसंताच्या चाहूलीने कोकीळा लागते गाऊ
------- रावांच्या नावाचा नाही वाटत बाऊ

८६० चटक चांदणी शुभ्रतेची कला
------- रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला
८६१ कोवळया पालवीने लागते वसंताची चाहूल
------- रावांच्या संसारात टाकते मी पाऊल
८६२ राम, लक्ष्मण निघाले सीता म्हणते मीही येते
------- रावांचे नाव तुमच्या आग्रहाकरिता घेते
८६३ सागर सरिताच्या मिलनातुन उमलली कलीका
------- रावांचे नाव घेते -------- ची बालीका
८६४ गुलाबाचे फुल तोडताना रुततो काटा
------- रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा
८६५ सात पावले चालुन जाता स्वर्ग आले हाता
-------रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांकरिता
८६६ पुर्वेकंडून आला वारा पश्चिमेकडून आला पाऊस
------- रावांनी केली नाही -------- हाऊस
८६७ बालपण संपुन आलयं आता यौवन
------- रावांचे नाव घ्यायला कशाला हवं प्रयोजन
८६८ सरस्वतीच्या देवळात अगरबत्तीचा पुडा
------- रावांच्या नावाने भरला हातभर चुडा
८६९ न कळताच भातुकली संपुन स्वामिनी मी झाले
------- रावांच्या सहवासात आनंदाने न्हाले
८७० भरल्या ताटाला देते रांगोळीची शोभा
-------रावांच्या विद्येला आहे विनयाची प्रभा
८७१ बालपण सारे बागडण्यात गेले, नकळत यौवनात पदार्पण झाले
------- राव मला पती मिळाले नी भाग्य माझे उजळुन निघाले
८७२ संसाराच्या चौकोनाची केली पुर्तता
------- रावांचे नाव घेते तुम्हा सर्वा करिता
८७३ आई वडीलांनी केले लग्न, लग्नानंतर केले कन्यादान
------- रावाना मिळाला -------- च्या जावयाचा मान
८७४ श्री गजाननाला वंदन करुन पहिलं पाऊल टाकलं जपुन
------- रावांबरोबर चालता चालता देहभान गेले विसरुन
८७५ अभिमान नसावा स्वरुपाचा गर्व नसावा पैशाचा
------- रावांचा शब्द नेहमीच असतो सुखाचा
८७६ संसाराच्या अंगणात ऊन पावसाचा खेळ
-------रावांच्या अन माझ्या संसारी इंद्रधनुष्याचा मेळ
८७७ तांब्याच्या संज्यापात्रात न्हानत होती श्रीक्रुष्ण कांत
-------रावांच्या मनाचा न लागे अंत
८७८ सुखी माझ्या संसाराला नित्य लागे सांजवात
पावलो पावली मिळे मला ------- रावांची सुंदर साथ
८७९ काचेच्या बशीत ठेवली बर्फी
------- रावांच्या नावासाठी सर्वांनी केली गर्दी

८८० वडिलांना पडली होती काळजी कसे मिळेल घर
------- रावांसारखे शांत मिळाले वर
८८१ शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
------- राव आहेत माझे जीवन साथी
८८२ दारी होती विहीर, विहीरीवर होते बारा हंडे
बाराहंडयावर बाराकरंडे, बाराकरंडयावर बारा वाती
------- राव माझे शंकर आणि मी त्यांची पार्वती

८८४ झुन झुन झुन्यात, बसली मेण्यात
कंचोळी अंगात गुलाल भांगात
जायफळ वटीत लवंगा दोळे मुठीत
हंडयावर परात, परातीत भात
भातावर तुप, तुपासारखे रुप
रुपासारखा जोडा ------- रावांना म्हणते
सारीकामे सोडा अन माहेरी चला

८८५ साखरेचे खाणार त्याला देव देणार
-------- रावांसाठी आज मी गौरीहर पुजणार
८८६ घरोघरी मातीच्या चुली
-------- रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
८८७ नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
-------- रावांसह मी बसते जेवायला
८८८ वडयाचं तेल वांग्यावर
-------- रावांचे नाव आहे माझ्या ओठांवर
८८९ ऐकावे जनाचे करावे मनाचे
-------- राव आहेत मोठया उदार मनाचे
९०० चंदनाचा पाट आणि चांदीचे ताट
-------- रावांसंगे राहण्यात आहे मोठा थाट
९०१ वासरात लंगडी गाय शहाणी
-------- रावांची झाले आज अर्धांगिनी
९०२ चार दिवस सासुचे, चार दिवस सुनेचे
-------- रावांचे नी माझे बंधन आहे सात जन्माचे
९०३ संसारातील रेशमी शालूवर प्रीतीची लावते फुलवात
-------- राव देतात मला सुखदुःखात आधार
९०४ तिरंगी ध्वजाला चंदनाची काठी
-------- रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती
९०५ ह्रदयात असावे प्रेम, प्रेमात असावा त्याग
त्यागात असावी निष्ठा, निष्ठेत असावी क्रुती
क्रुतीत असावी कला -------- च्या संसारात काय उणे मला

No comments:

Post a Comment